MHT CET Result : बेस्ट ऑफ लक ! आज महाराष्ट्रात CET चा निकाल, पाहा एका क्लिकवर

Maharashtra CET Results : MHT CET निकाल 2023 सोमवार 12 जून रोजी म्हणजे आज जाहीर केले जातील.
MHT CET Result
MHT CET ResultSaam Tv
Published On

MHT CET Results : महाराष्ट्र राज्य सरकारच्या राज्य एकत्रित प्रवेश परीक्षा (MHT CET) कक्षाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM)तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) साठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेचे निकाल आज जाहीर होणार आहेत

9 जून रोजी MHT CET सेलने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार, MHT CET PCM निकाल (Result) 2023 आणि MHT CET PCB निकाल 2023 सोमवार 12 जून रोजी म्हणजे आज जाहीर केले जातील. उमेदवार आज सकाळी ११ वाजल्यापासून त्यांचा निकाल आणि रँक तपासू शकतील.

MHT CET Result
Career After 12th in Arts : आर्ट्समधून बारावी झालीये ? कोणत्या क्षेत्रात सुर्वणसंधी ? करियर ऑप्शन कसे असतील ? जाणून घ्या सविस्तर

1. कधी घेण्यात आली होती परीक्षा ?

MHT CET PCM गटासाठी 9 मे ते 14 मे आणि PCB गटासाठी 15 मे ते 20 मे दरम्यान घेण्यात आली. २६ मे रोजी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांना 28 मे पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली होती.

2. कसा तपासाल निकाल ?

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी cetcell.mahacet.org या संकेत स्थळाला (Website) भेट देऊ शकतात.

  • होम पेजवर 'MHT CET Result 2023' लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहीती भरावयाची आहे.

  • त्यानंतर महाराष्ट्र CET निकाल 2023 स्क्रीनवर ओपन होईल तो तपासा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com