Afternoon Nap : दुपारी २ ते ३ च्या दरम्यान तुम्हालाही खूप झोप येते? जाणून घ्या यामागचं कारण

Reason Of Afternoon Nap : ऑफिस किंवा शाळेत अथवा अन्य कामाच्या ठिकाणी व्यक्ती झोपेत डुलक्या घेत असल्याचं तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आता ही झोप नेमकी का येते त्याचं कारण जाणून घेऊ.
Reason Of Afternoon Nap
Afternoon NapSaam TV

ऑफिसमध्ये, कॉलेज, शाळा किंवा घरी दुपार झाली की अनेकांना भारपूर झोप येते. काही झालं तरी चालेल पण मला ५ मिनिटे झोपू द्या, असा विचार अनेकांच्या मनात येतो. ऑफिस किंवा शाळेत अथवा अन्य कामाच्या ठिकाणी व्यक्ती झोपेत डुलक्या घेत असल्याचं तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आता ही झोप नेमकी का येते त्याचं कारण जाणून घेऊ.

रात्रीची अपूरी झोप

अनेक व्यक्ती रात्री जास्त वेळा जागतात आणि रात्री उशिरा झोपतात. रात्री झोपायला उशिर झाल्यावर सकाळी लवकर जाग येत नाही. मात्र सकाळी ऑफिस असल्याने झोप पूर्ण झाली नाही तरी लवकर उठून जावं लागतं. यामुळे आपल्याला दुपारच्या वेळात झोप येते.

दुपारचं जेवण

दुपारी प्रत्येक व्यक्तीने गरजेपुरतंच जेवण केलं पाहिजे. मात्र आवडीची भाजी किंवा आवडीचा एखादा पदार्थ असल्याने काही व्यक्ती दुपारी जास्तीचं जेवण करतात. जेवण जास्त झालं की मग सुस्ती येते. त्यामुळे दुपारी अनेकांना झोपावं वाटतं.

Reason Of Afternoon Nap
Memory Booster Foods: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चव आवडली नाही तरीही 'हे' पदार्था नक्की खा

मेंदूला रक्तपुरवठा निट होत नसल्यास

काही व्यक्तींना आजरपणात मेंदूला व्यवस्थीत रक्त पुरवठा होत नाही. रक्तपुरवठा निट होत नसल्याने देखील त्याचा पूर्ण परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा व्यक्तींचे सतत डोके दुखते आणि त्यांना झोपावे वाटते.

कावीळ

ज्या व्यक्तींना कावीळ होते त्यांना देखील सतत झोप येते. जेवण पचत नाही. अशक्तपणा जास्त वाढतो. त्यामुळे अशा व्यक्तींना जास्त प्रमाणात झोप येते. तुम्हालाही जास्त झोप येत असेल तर कावीळीची टेस्ट करून घ्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Reason Of Afternoon Nap
Health Tips: बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; 'हे' आजार होण्याचा असतो धोका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com