Mangala Gauri Vrat 2023: श्रावणातील मंगळागौर, जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि पूजा पद्धत

Mangala Gauri Vrat Date : आज श्रावणातली पहिला मंगळागौर आहे. या दिवशी शिवपार्वतीची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते.
Mangala Gauri vrat 2023
Mangala Gauri vrat 2023Saam Tv
Published On

Mangala Gauri Vrat Puja Vidhi in Marathi :

श्रावण महिना सुरु झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरु होतात. या महिन्यात ऊन सावलीच्या खेळासोबत अनेक सणांची सुरुवात होते. त्यातील एक मंगळागौर. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे व्रत म्हणजे मंगळागौरी होय.

पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. आज श्रावणातली पहिला मंगळागौर आहे. या दिवशी शिवपार्वतीची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते.

Mangala Gauri vrat 2023
Budh Vakri 2023 : ग्रहांचा राजा होणार वक्री! या राशींना लागणार ग्रहण, करिअरमध्ये मोठे नुकसान

22 ऑगस्ट 2023 रोजी मंगळागौरचा पहिला व्रत. या दिवशी भगवान शिव (Shiv) आणि माता पार्वतीला समर्पित मंगळागौर व्रत केले जाईल. यासोबतच आज कल्की जयंतीही साजरी केली जाणार आहे. यासह आज चार अतिशय शुभ योग तयार होणार आहेत.

असे म्हटले जाते की, या शुभ दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णूचे अवतार भगवान कल्की यांची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. जाणून घेऊया मंगळागौरचा शुभ मुहूर्त कोणता.

Mangala Gauri vrat 2023
Deepa Parab: तुझं असं सौंदर्य पाहून सारं रान झालं हिरवं

1. आजचे पंचांग (पंचांग २२ ऑगस्ट २०२३)

  • श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी - २३ ऑगस्ट, पहाटे ४:३५ वाजता

  • शुक्ल योग समाप्त - 23 ऑगस्ट, रात्री 11.48 पर्यंत

  • ब्रह्मयोग सुरू होतो - 23 ऑगस्ट, रात्री 11.48 पासून

  • चित्रा नक्षत्र - सकाळी 08:01 ते 01:00 पर्यंत

2. शुभ वेळ (Time)

  • ब्रह्म मुहूर्त - पहाटे 04:34 ते पहाटे 05:20 पर्यंत

  • संध्याकाळची वेळ - संध्याकाळी 06:39 ते संध्याकाळी 07:02 पर्यंत

  • रवि योग - सकाळी 08:01 ते 23 ऑगस्ट सकाळी 06:05 पर्यंत

3. मंगळागौरची पूजा का करतात?

श्रावण (Shravan) महिन्यातील मंगळवारी मंगळागौरी पूजनाला सुरुवात होते. असे म्हटले जाते की, पतीपत्नीमधील प्रेम व निष्ठा वाढावी, शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. नुकतेच लग्न झालेल्या स्त्रियांनी हे व्रत प्रामुख्याने करायचे असते. मंगळागौरच्या निमित्ताने महिला एकत्र येत नवविवाहितेचं गोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो.

Mangala Gauri vrat 2023
Famous Travel Places In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

4. मंगळागौरीचं व्रत कसं करतात ?

सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर श्रीगणेशाची पूजा केली जाते. लग्नात माहेरकडून मिळालेली अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापित करावी. त्याच्याबाजूला शिवपिंड, समोर कणकेच्या दिव्यांची आरास करावी. त्यानंतर मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचं आवाहन करावं.

Mangala Gauri vrat 2023
Fish Good For Eyes: मासे खाल्ल्याने खरंच डोळे ऐश्वर्या रायसारखे सुंदर होतात का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

देवीला विविध फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. नंतर मग एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचावी. कहाणी वाचून झाली की महानैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पन करतांना 16 दिव्यां त्या नैवद्यासमोर लावावेत. यानंतर मनोभावे पूजा करुन अखंड सौभाग्य प्राप्तीचा वसा मागावा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com