Lipstick Shades : 'या' लिप्सटीक शेडमध्ये २५ ते ३० वर्षांच्या महिला दिसतात एकदम हॉट; आजच कलेक्शनमध्ये अ‍ॅड करा

Lipstick Shades For 25 to 30 Year Old Woman : २५ ते ३० वर्षातील महिलांकडे या लिप्सटीक शेड असल्याच पाहिजेत. या शेड तुम्ही स्किन टोननुसार देखील निवडू शकता.
Lipstick Shades For 25 to 30 Year Old Woman
Lipstick ShadesSaam TV
Published On

प्रत्येक व्यक्तीचा वयानुसार चेहरा बदलत जातो. २५ते ३० या वयोगटातील महिला सुंदर दिसण्यासाठी बराच मेकअप करतात. मेकअपमध्ये प्रत्येक मुलीकडे एक लिप्सटीक कॉमन असते. आपल्या वयानुसार चेहरा बदलत असल्याने आपण कोणत्या लिप्सटीक शेड अप्लाय केल्या पाहिजेत याची अनेक महिलांना व्यवस्थित माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला २५ ते ३० या वयोगटातील मुलींकडे कोणत्या पद्धतीच्या लिप्सटीक शेड असल्या पाहिजेत याची माहिती सांगणार आहोत.

हॉट रेड कलर

हॉट रेड कलर सर्वच तरुणींवर सुट करतो असं नाही. जर तुमची स्किन टोन ब्राइट असेल तरच तुम्ही लाल रंगाची लिप्सटीक लवाली पाहिजे. सावळ्या मुलींना हॉट रेड म्हणजे ब्लड रेड कलर शोभून दिसत नाही.

Lipstick Shades For 25 to 30 Year Old Woman
Winter Bridal Makeup Tips : थंडीच्या दिवसांत नवरीला अशा पद्धतीने करा तयार, तुमचा मेकअप कधीच बिघडणार नाही

न्यूड पिंक शेड

न्यूड पिंक शेड ही अशी शेड आहे जी प्रत्येक वयोगटातील मुलीवर सुट करते. तसेच यासाठी ठरावीक स्किन टोन सुद्धा आवश्यक नाही. तुम्ही कोणत्याही स्किन टोनचे असलात तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर न्यूड पिंक शेडमधील लिप्सटीक फार छान दिसते. मात्र ही लिप्सटीक लावताना आउटफीटच्या रंगावर लक्ष द्या. तुम्ही फिकट रंगाचे आउटफीट वेअर केले असतील तर त्यावर ही शेड सूट करणार नाही.

कॉफी शेड लिप्सटीक

कॉफी डार्क शेडमधील लिप्सटीक सहसा सावळ्या मुलींना सुंदर दिसते. नॉर्मल कोणतीही लिप्सटीक बॉर्डर अप्लाय करा आणि त्यावर कॉफी शेड लिप्सटीक लावा. ही लिप्सटीक सावळ्या रंगाच्या प्रत्येक मुलीला अगदी शोभून दिसते. तुम्ही जर गोऱ्या असाल तर ही शेड शक्यतो निवडू नका.

रुबी रेड शेड

रुबी रेड शेडचं टेक्सचर अगदी क्रिमी असतं. त्यामुळे ओठांवर नेहमी याच शेडची लिप्सटीक अप्लाय करा. या शेडची लिप्सटीक ओठांवर लावल्याने तुम्ही आहात त्याहून अधिक सुंदर आणि ब्राइट दिसता. त्यामुळे पार्टी वेअर आउटफीट असल्यास ही शेड तुम्ही निवडू शकता.

Lipstick Shades For 25 to 30 Year Old Woman
Makeup Remover Tips: 'या' नैसर्गिक पदार्थांनी निघेल झटपट मेकअप; कोणताही साईड इफेक्ट नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com