Winter Bridal Makeup Tips : थंडीच्या दिवसांत नवरीला अशा पद्धतीने करा तयार, तुमचा मेकअप कधीच बिघडणार नाही

प्रत्येक नवरी ही आपल्या लग्नात कपड्यांपासून ते मेकअप या सगळया गोष्टींकडे विशेष लक्ष देते.
Winter Bridal Makeup Tips
Winter Bridal Makeup TipsSaam Tv
Published On

Winter Bridal Makeup Tips : नवरीला लग्नामध्ये सगळ्यांपेक्षा खास आणि वेगळं दिसायचं असतं. प्रत्येक नवरी ही आपल्या लग्नात कपड्यांपासून ते मेकअप या सगळया गोष्टींकडे विशेष लक्ष देते.

लग्नाचे कपडे, दाग दागिने सगळं काही व्यवस्थित असलं तरीसुद्धा तुमचा मेकअप चांगला नसेल तर तुमचा लूक पूर्णपणे खराब दिसू शकतो. खास करुन थंडीच्या दिवसांत सगळ्यांचीच त्वचा कोरडी पडलेली असते. त्यामध्ये ब्रायडल मेकअप करायचं म्हणलं तर तुम्हाला तुमच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागेल.

तुम्ही जर ब्रायडल मेकअप करत असालं तर तुम्हाला काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. ब्रायडल मेकअप करताना तुम्हाला ऋतुंच्या हिशोबाने मेकअप करायला हवा. उन्हाळ्यात त्वचा अगदीचं चिपचीप असते तर तेव्हा तुम्ही मॅट फाउंडेशन सोबत काम करून मॅट फिनिश मेकअप करायला हवा.

अशातच थंडीच्या (Cold) दीवसांमध्ये ब्रायडल मेकअप करताना जास्त अडथळा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी पडलेली असते. त्यामुळे बऱ्याचदा मेकअप केल्यावर तो फुटल्यासारखा दिसू शकतो.

मेकअप करताना तुमची त्वचा हायड्रेट असली पाहिजे. आज बातमीपत्रातून आरवीएमयुए अकॅडमीची फाउंडर, स्किन (Skin) केअर एक्सपर्ट आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट रिया हिने ब्रायडल मेकअप करत असताना कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगितले आहे.

Winter Bridal Makeup Tips
Winter Care Tips : हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचा त्रास जडलाय ? 'या' टिप्स फॉलो करा

चेहऱ्यावरचा मेकअप फुटू नये म्हणून बऱ्याच स्त्रिया भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझरचा वापर करतात. त्यांना असं वाटतं की, आपण जेवढं जास्त मॉइश्चरायझर लावू तेवढीच आपली त्वचा जास्त कोमल बनेल.

पण असं करणं अत्यंत चुकीचं आहे. जास्त मॉइश्चरायझर लावल्याने तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहू शकत नाही. मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी सर्वात आधी चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावा. त्यानंतर चेहरा दहा मिनिटे तसाच ठेवा. दहा मिनिटांनंतर चेहऱ्यामध्ये मॉइश्चरायजर सेट होऊन जाईल.

त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर वॉटर स्प्रे मारून टिशूच्या सहाय्याने ड्याबिंग मोशनमध्ये चेहऱ्यावरचे एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही मेकअप ला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर थंडीच्या दिवसात मेकअप पूर्ण करून झाल्यावर कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर वापरत असाल.

पण असं केल्याने तुमचं संपूर्ण मेकअप फुटल्यासारखा दिसू शकतो आणि चेहरा सुद्धा डल दिसू शकतो. कारण थंडीच्या दिवसात तुमची त्वचा आधीच कोरडी पडलेली असते. त्यात तुम्ही मेकअप नंतर कॉम्पॅक्ट आणि लूज पावडर लावत असाल. सर तुमचा मेकअप पूर्णपणे बिघडू शकतो.

Winter Bridal Makeup Tips
Winter Body Care : हिवाळ्यात हाता-पायांची त्वचा सतत कोरडी पडते ? 'या' टिप्स फॉलो करा, मिनिटांत मिळेल फरक

कॉम्पॅक्ट आणि लूज पावडर हे दोन प्रॉडक्ट चेहऱ्यामधून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तेलाला लॉक करायचं काम करतात. म्हणूनच थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी असल्यामुळे कॉम्पॅक्ट आणि लूज पावडरचा वापर करणे टाळले पाहिजे.

त्याचबरोबर थंडीच्या दिवसांत तुम्ही वॉटर बेस फाउंडेशनचा वापर करत असाल तर त्यामध्ये एक-दोन थेंब इसेन्शियल ऑईल किंवा फेस सिरम जरूर टाका. असं केल्याने तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस दिसेल.

वॉटर बेस फाउंडेशन तुमच्या त्वचेला अजून कोरडं बनवू शकतो. आम्ही सांगितल्याप्रमाणे फाउंडेशन आपल्या केल्यास तुमचा मेकअप खूप सुंदर दिसेल. त्याचबरोबर थंडीच्या दिवसांत तुम्ही मेकअप करत असाल तर, तुम्हाला लिपस्टिक शेडकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. विंटर मध्ये नवरीला डीप कलर्स नाही द्यायला पाहिजे.

त्याजागी तुम्ही ब्राईडला ब्राईट कलर्स जसं की रेड, हॉट पिंक अशा पद्धतीचे मेकअप शेड्स करायला पाहिजे. असं केल्याने तुमच्या नवरीचा लूक फारच सुंदर दिसेल. मेकअप करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. तुम्हाला नवरीच्या ओठांना हायलाईट करणे गरजेचे असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com