Maharashtra Day 2026 Wishes: १ मे हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा तर कामगारांसाठी सन्मानाचा दिवस आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दुहेरी उत्सवाच्या निमित्ताने राज्यभर आनंदाचे वातावरण असते. या खास दिवशी अनेकजण आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा देऊन हा दिवस अधिक अर्थपूर्ण करतात.
महाराष्ट्र दिन हा राज्याच्या स्थापनेचा दिवस असल्यामुळे मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडलेला आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून दरवर्षी १ मे रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरीकडे, कामगार दिन हा मेहनत करणाऱ्या प्रत्येक कामगाराला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो.
या विशेष दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची परंपरा अधिकच वाढली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर सुंदर मेसेज, कोट्स आणि स्टेटस शेअर करून लोक आपल्या भावना व्यक्त करतात.
काही खास शुभेच्छा संदेश:
१) “माझ्या महाराष्ट्राची शान, संस्कृतीची ओळख आणि परंपरेचा अभिमान...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
२) “मेहनती हातांना सलाम! कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
३) “एकतेतून घडलेलं राज्य, प्रगतीकडे सुरु वाटचाल... महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”
४) “तुमच्या कष्टामुळेच देश उभा आहे; कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
५) “महाराष्ट्राची माती, परंपरा आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगा, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!”
६) “सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला अभिमान… महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
७) “मराठी माणसाचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख – तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
८) “घामाच्या थेंबांतून घडतो विकास – कामगार दिनाच्या शुभेच्छा!”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.