Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर चवळी आहारात का समाविष्ट करावी? चवळीतील प्रोटीन आणि फायबर पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करू शकतात. वजन मॅनेजमेंटसाठी चवळीचे फायदे आणि तिचे पोषणमूल्य जाणून घेऊया.
Health Tips
Health Tipssaam tv
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढतं वजन ही अनेकांसमोरची मोठी समस्या झालीये. वाढलेल्या वजनाचा परिणाम फक्त शरीराच्या दिसण्यावर होत नाही तर आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि सांधेदुखी यांसारख्या अनेक समस्या वाढत्या वजनामुळे होऊ शकतात.

वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासन्‌तास व्यायाम करतात. काही जण वेगवेगळं डाएट करून पाहतात. तर काही जण वजन कमी करण्यासाठी दिवसभर कमी खातात किंवा उपाशी राहतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे चवळी.

Health Tips
Cancer Warning Signs: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होताना मिळतात'हे' 7 छोटे संकेत; दुर्लक्ष करणं धोकादायक!

चवळी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकतं, असं काही वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे. चवळी ही एक प्रकारची कडधान्याची डाळ आहे. चवळीचे दाणे छोटे आणि पांढऱ्या रंगाचे असतात. त्यावर काळ्या किंवा तपकिरी रंगाचा छोटा डाग असतो. दिसायला साधी वाटणारी चवळी अनेक पोषक घटकांनी भरलेली आहे.

चवळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन

अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, चवळीमध्ये सुमारे 20.43 टक्के प्रोटीन आढळतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रोटीन महत्त्वाचं असतं.

संशोधनात चवळी शिजवून दिल्यानंतर त्यातील प्रोटीन शरीराला मिळण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. यासाठी प्रोटीन एफिशिएंसी रेशो (PER) या मापाचा वापर करण्यात आला. एखाद्या पदार्थातून शरीराला प्रोटीन किती चांगल्या प्रकारे मिळतं, हे जाणून घेण्यासाठी या मापाचा उपयोग केला जातो.

संशोधनानुसार, चवळी शिजवण्यापूर्वी तिचा PER 1.05 होता. मात्र, शिजवल्यानंतर तो 1.47 इतका झाला. म्हणजेच चवळी शिजवल्यानंतर त्यातील प्रोटीन शरीरासाठी अधिक उपयोगी ठरू शकतं.

Health Tips
Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

चवळी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं

चवळीमध्ये प्रोटीनसोबतच फायबरचं प्रमाणही चांगलं असतं. फायबरमुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. भूक कमी लागल्यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या कॅलरीचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. याचा वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना फायदा होऊ शकतो.

चवळीतील प्रोटीन शरीरातील स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतं. शरीरातील स्नायू मजबूत झाले की शरीर अधिक ऊर्जा वापरतं. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याच्या प्रक्रियेलाही मदत होऊ शकते.

चवळी वजन कमी करण्यासाठी कशी मदत करते?

चवळी दोन प्रकारे उपयोगी ठरू शकते. पहिलं म्हणजे त्यातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी होण्यास मदत होते. दुसरं म्हणजे त्यातील प्रोटीनमुळे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत मिळते.

Health Tips
Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

संशोधनात चवळीमध्ये 20 टक्के मांसाहारी पदार्थ मिसळून दिल्यानंतर त्यातील प्रोटीन पचण्याचं प्रमाणही वाढल्याचं आढळून आलं. हे प्रमाण 74.9 टक्क्यांवरून 84.3 टक्क्यांपर्यंत वाढलं. यामुळे शरीराला प्रोटीनमधून अधिक पोषण आणि ताकद मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे चवळी हा प्रोटीन आणि फायबरचा चांगला स्रोत म्हणून आहारात समाविष्ट करता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com