Laser Light Side Effects: लेझरच्या प्रकाशझोतानं दृष्टी जाऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

DJ Laser Light Effects : नुकतेच पुणे-नाशिक शहरात गणेशोत्सवादरम्यान सुरु असलेल्या लेझर शोमुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची घटना समोर आली आहे.
Laser Light Side Effects
Laser Light Side EffectsSaam Tv
Published On: 

Eye Care Tips :

नुकतेच पुणे-नाशिक शहरात गणेशोत्सवादरम्यान सुरु असलेल्या लेझर शोमुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची घटना समोर आली आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला वारंवार सांगितले जाते. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

वाढता स्क्रिन टाइम, स्मार्टफोन-लॅपटॉप आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light)आपल्या डोळ्यांवर ताण आणते. ज्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे आणि अंधुक दिसणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशातच डोळ्यांवर लेझर लाइट्सचा प्रभाव वाढल्यामुळे त्यावर ताण पडू लागतो.

Laser Light Side Effects
Weight Loss Drink : पोट सुटतंच चाललं? आठवड्याभरात कमी करण्यासाठी प्या हे ड्रिंक्स, दिसाल स्लिम-फिट

नाशिक - पुणे सारख्या शहरात लेझरच्या (Laser) प्रकाशझोतात आलेल्या लोकांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागला. परंतु, यामुळे दृष्टी गमावली जाते का? डोळ्यांवर (Eye) याचा कसा परिणाम होतो? जाणून घेऊया सविस्तर

एका वृत्तसंस्थेत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते म्हणाले की, लेझरमुळे डोळे गेले, दिसेनासे झाले किंवा दूरदृष्टी कमी झाली यांसारखे अनेक केस माझ्या समोर आले. याचे कारण असे की, मिरवणूकीत वापरला गेलेला लेझरचा प्रकाश हा ५ मिली वॅटपेक्षा जास्त होता. त्याचा परिणाम डोळ्यांवर झाला. या प्रकाशामुळे डोळ्यांच्या रेटिनावर (Retina) ताण आल्यामुळे रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते.

डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, तसेच प्रकाश सहन न होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. लेझर लाइटमुळे डोळ्यांची दृष्टी गमावण्याची भीती निर्माण होते. डोळ्यांच्या नेत्रपटलावरच्या बाजूला जखमा झाल्याने रक्तस्त्रावही जमा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.