Paneer Vs Tofu : टोफू की पनीर? आरोग्यासाठी सुपरफूड कोणते? वाचा फायदे-तोटे

Health Care Tips : सारख्या दिसणाऱ्या टोफू आणि पनीरमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊयात. तसेच आरोग्यासाठी कोणता पदार्थ जास्त फायदेशीर हे ओळखा.
Health Care Tips
Paneer Vs TofuSAAM TV
Published On

पनीर आणि टोफू दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. शरीराच्या गरजेनुसार यांचे सेवन केल्यास आरोग्याला फायदा होतो. मात्र पनीर(Paneer) आणि टोफू हे दोन्ही भिन्न पदार्थ आहेत. टोफू (Tofu ) आणि पनीर दिसायला जरी सारखे असले तर त्यांची चव आणि त्यांमधील पोषक घटक वेगळे आहेत. हे दोन्ही पदार्थ कॅल्शियमने समृद्ध आहेत. शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा उत्तम खजिना आहे.

पनीर आणि टोफूमधील फरक

  • पनीर हा दुग्धजन्य पदार्थ आहे तर टोफू हा सोयापासून बनवला जातो.

  • पनीर ताजे आणि मऊ असते.

  • टोफू पनीरपेक्षा कमी मऊ असते.

  • टोफू चवीला हलके आंबट असते. तर पनीरला पाण्यासारखी चव लागते.

  • पनीर हा फॅटयुक्त पदार्थ आहे तर टोफूमध्ये कमी फॅट असतात. वजन कमी करायचे असल्यास टोफूचे सेवन करावे.

  • टोफूच्या तुलनेत पनीरमध्ये जास्त कर्बोदके असतात.

  • टोफूमध्ये पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी टोफूचे सेवन करावे.

Health Care Tips
Medicine Taste : औषधांच्या गोळ्यांची चव कडू का असते? जाणून घ्या यामागील कारण

मांसपेशींचे आरोग्य

मांसपेशींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी टोफूचा आपल्या आहारात समावेश करावा. टोफूमधील ॲमिनो ॲसिड्स शरीराला भरपूर ऊर्जा देते. याच्या सेवनामुळे स्नायूंचे आरोग्य चांगले राहते. तसेच हाडे मजबूत होतात.

हृदयाचे आरोग्य

हृदयाचे (Heart)आरोग्य चांगले राहण्यासाठी टोफू उपयुक्त आहे. कारण टोफूमधील फ्लेव्होनॉइड्स उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच टोफूच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care Tips
Sperm Count : किती असला पाहिजे पुरुषांचा स्पर्म काऊंट? WHO ने सांगितला आकडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com