Medicine Taste : औषधांच्या गोळ्यांची चव कडू का असते? जाणून घ्या यामागील कारण

Medicine Taste : आपण घेत असलेल्या बहुतेक औषधांची चव ही कडू असते. मात्र आपण कधी विचार केलाय का की, औषधांची चव कडूच का असते. यामागे नेमकं काय कारण आहे, ते पाहूयात.
Medicine Taste
Medicine TasteYANDEX
Published On

आजारी पडल्यानंतर तुम्हाला औषध हे घ्यावच लागतं. आपल्यापैकी काही जण असे असतील जे औषध घेतल्यानंतर तातडीने काही गोड खातात. याचं कारण असतं ते म्हणजे, औषधांची चव. औषधांच्या गोळ्यांची चव कडू असल्याने अनेकजण या कारणाने नाकं मुरडतात. मात्र तुम्ही कधि विचार केला आहे का, की औषधांच्या गोळ्यांची चव कडू का असते?

बहुतेक औषधांच्या गोळ्या किंवा सिरप घेतल्यावर त्याची चव कडू लागते. दरम्यान औषधं घेतल्यानंतरही अनेक तास तोंड कडू राहतं. यामुळेच अनेकजण औषधं घेणं टाळतात. सर्वच औषधं कडू नसतात, काहींची चव गोड देखील असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बहुतेक औषधं कडू का असतात? तर याचं कारण म्हणजे ती मुद्दाम अशी का बनवली जातात.

Medicine Taste
Sperm Count : किती असला पाहिजे पुरुषांचा स्पर्म काऊंट? WHO ने सांगितला आकडा

अधिकतर औषधं कडू का असतात?

तज्ज्ञांच्या मते, औषधे बनवण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स आणि कपाऊंड्स वापरण्यात येतात. याचमुळे त्यांची चव कडवट असते. याशिवाय काही औषधांमध्ये अल्कलॉइड असतं जसं की, कोडीन, कॅफीन, टेरपीन यांसारखे कडू केमिकल्स मिसळली जातात. यामुळे देखील औषधांची चव कडू लागते. ते शरीराच्या अवयवांवर देखील परिणाम करतात. अनेक औषधं वनस्पतींच्या कंपाऊंडस् पासून देखील तयार केली जातात, ज्यामुळे त्याची चव कडू लागू लागते.

काही औषधांची चव गोड का लागते?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, काही औषधांची चव चांगली किंवा गोड होण्यासाठी त्यामध्ये साखर मिसळली जाते. या गोळ्या शुगर कोटींगमुळे गोड लागतात. मात्र ही गोष्ट सर्व औषधांमध्ये होत नाही. त्यामुळे त्यांची चव कडू राहते.

Medicine Taste
Kidney Health: किडनीला निरोगी ठेवायचंय? 'या' सवयींचं करा पालन, राहा निरोगी

काही जणांना कडू औषधं घेणं आवडत नाही. तर काही औषधं अधिकच कडू असतात अशा औषधांचं रूपांतर कॅप्सूलमध्ये केलं जातं. कॅप्सून गोळीचा वरचा थर मऊ जिलेटिनचा असतो, जो पोटात विरघळतो. यामुळे, लोक अगदी कडू औषधं देखील घेऊ शकतात.जर तुम्हाला कडू औषधे घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही ते मधासोबत घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com