Kitchen Tips : घरी पनीर बनवलं अन् वातड झालं? वापरा 'ही' खास युक्ती, येईल रेस्टॉरंटसारखी टेस्ट

How To Make Soft Paneer : चांगल्या आरोग्यासाठी आहारात पनीरचा समावेश करणे महत्त्वाचे असते. कारण यामुळे शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. त्यामुळे घरात मऊ पनीर कसा बनवायचा जाणून घ्या.
How To Make Soft Paneer
Kitchen TipsSAAM TV
Published On

आजकाल पनीर शिवाय कोणतीही थाळी पूर्ण होत नाही. पनीरचे असंख्य प्रकार आपण खातो आणि बनवतो. पनीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. पनीर बाजारात महाग मिळते. तसेच त्यात भेसळ असण्याचा धोका असतो. म्हणून अनेक जण घरीच पनीर बनवतात. मात्र अनेक जणांना घरी पनीर बनवताना अडचणी येतात. पनीर छान बनत नाही. कधी त्यांची चव बिघडते तर कधी पनीर कडक होतो. या समस्या दूर सारून झटपट, मऊ पनीर घरी कसा बनवायचा जाणून घ्या.

घरी पनीर बनवायची सोपी पद्धत

साहित्य

पाणी

१ टेबलस्पून व्हिनेगर

२ लिटर फुल क्रिम दूध

How To Make Soft Paneer
Bitter Gourd Pickle : कडू कारल्यापासून बनवा आंबट गोड लोणचं; रेसिपी नक्की ट्राय करून बघा, बोट चाटत रहाल

कृती

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी ओतून त्यामध्ये फुल क्रिम दूध घालावे. पाण्यामुळे दूध पातेल्याच्या तळाशी लागणार नाही. गॅस मंद आचेवर ठेवून दुधाला उकळी काढून घ्या. या दरम्यान दूध हळूहळू ढवळत राहणे गरजेचे आहे. उकळी आल्यावर गॅस बंद करा. दुसरीकडे एका छोट्या बाऊलमध्ये सम प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. हे मिश्रण हळूहळू दुधामध्ये टाका आणि सतत ढवळत राहा.

थोड्यावेळाने दूध आणि पाणी वेगळ झालेल पाहायला मिळेल. एका स्वच्छ मऊ कॉटनच्या कपड्यात हे मिश्रण ओतून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्या आणि कपडा गुंडाळून ठेवा. तुम्ही पनीर मधून संपूर्ण पाणी काढण्यासाठी कापडावर वजनदार वस्तू देखील ठेवू शकता. थोड्या वेळाने पनीर कपड्यातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अशा प्रकारे तुमचे घरगुती पनीर तयार झाले. कोणताही पदार्थ बनवा त्याला रेस्टॉरंटसारखी चव येईल.

How To Make Soft Paneer
Thick Malai At Home : दुधावर घट्ट साय येत नाही? 'या' ट्रिकने झटक्यात येईल जाडसर मलाईचा थर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com