Khandvi Recipe: नाश्त्याला बनवा टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल खांडवी; वाचा परफेक्ट रेसिपी

Khandvi Recipe in Marathi: खांडवी तुम्ही नशत्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. तसेच जेवणाबरोबर देखील खाऊ शकता. त्यामुळे आज याचे साहित्य तसेच कृती सुद्धा जाणून घेऊ.
Khandvi Recipe: नाश्त्याला बनवा टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल खांडवी; वाचा परफेक्ट रेसिपी
Khandvi Recipe Saam TV
Published On

महाराष्ट्रात अस्सल मराठमोळ्या पदार्थांसह अन्य राज्यातील पदार्थ देखील मोठ्या आवडीने खाल्ले जातात. साऊथ इंडियन इडली डोसा यांच्यासह गुजराती स्टाईल खमन आणि ढोकळा सुद्धा आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी गुजरातमधील खांडवी ही स्पेशल रेसिपी आणली आहे.

Khandvi Recipe: नाश्त्याला बनवा टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल खांडवी; वाचा परफेक्ट रेसिपी
Masala Corn Street Food : मुसळधार पावसात घरीच बनवा चटकदार मक्याचं कणीस

खांडवी तुम्ही नशत्यामध्ये सुद्धा खाऊ शकता. तसेच जेवणाबरोबर देखील खाऊ शकता. त्यामुळे आज याचे साहित्य तसेच कृती सुद्धा जाणून घेऊ.

साहित्य

  • 200 ग्राम बेसन पीठ

  • 1 कप दही

  • हिरवी मिरची

  • अद्रक पेस्ट

  • ओलं खोबरं

  • कोथिंबीर

  • कडीपत्ता

  • तेल

  • जिरे

  • मोहरी

  • मीठ

कृती

खांडवी बनवण्यासाठी सर्वात आधी बेसन पीठ छान बारीक चाळून घ्या. त्यानंतर या पिठात दही मिक्स करा. दहिमुळे पिठात गुठळ्या होतील त्या छान फोडून पीठ एकजीव करा. पुढे या मिश्रणात आद्रक पेस्ट आणि हळद तसेच चवीनुसार मीठ सुद्धा मिक्स करा.

पुढे यामध्ये थोडं पाणी टाकून घ्या. तसेच गॅसवर ठेवा. पाणी आणि पिठाचे मिश्रण घट्ट हाउद्या. हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. तुम्ही आवडीनुसार या पिठात जिरे सुद्धा टाकू शकता.

मिश्रण थोडं थंड झालं की ते एका ट्रेवर किंवा सपाट प्लेटवर छान पसरवून घ्या. मिश्रण पसरवून झाल्यावर सुरी किंवा चामच्याच्या साहाय्याने याचे काप करून रोल तयार करून घ्या. त्यानंतर सर्व रोल एका प्लेटमध्ये ठेवा आणि तडक्याची तयारी करा.

तडका देताना तेल तापण्यासाठी ठेवा. तेल छान तापलं की त्यावर मोहरी टाका. मोहरी मस्त ततडली की मग जिरे आणि एक मिरची उभी चुरून यात टाका. तसेच यात कडीपत्ता देखील टाका. तयार फोडणी बेसनाच्या रोलवर घ्या. तयार झाली तुमची टेस्टी खांडवी. ही खांडवी अगदी ओठाने तोडावी इतकी मऊ होते. तसेच ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर बारीक चिरून यावर फिरवून घ्या.

Khandvi Recipe: नाश्त्याला बनवा टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल खांडवी; वाचा परफेक्ट रेसिपी
Food Poisoning : पावसाळ्यात होणार्‍या फूड पॉयझनिंगवर घरगुती रामबाण उपाय, मिनिटात पोटाला मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com