Ruchika Jadhav
मक्याचे उत्पादन फक्त पावसाळा या ऋतुमध्येचं होतं.
अशात मुंबईसह गावात आणि विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे.
पावसामुळे सर्वत्र मातीचा सुगंध दरवळत आहे. बाहेर अगदी रोमँटीक वातावरण झालं आहे.
अशात आता तुम्हालाही मक्याचं कणीस खावं असं वाटत असेल.
तर मसालेदार स्ट्रिट स्टाइल मक्याचं कणीस घरच्याघरी कसं बनवायचं याची माहिती जाणून घेणार आहोत.
त्यासाठी बाजारातून छान भरलेले मक्याचे कणीस घेऊन या. ते सोलून घ्या.
त्यानंतर हे कणीस कोळशावर किंवा गॅसवर मस्त खरपूस भाजून घ्या.
पुढे मीठ, थोडी हळद आणि मसाला एकत्र मिक्स करा. लिंबू आडवा कापून या मसाल्यात बुडवा आणि कणीसवर चोळून घ्या.