Javitri Benifits : आरोग्यासाठी व वजन कमी करण्यासाठी जावित्री आहे उत्तम औषध, अशाप्रकारे करा वापर

Ayurvedic Benefits of Javitri : जावित्री हे एक प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे जे वजन कमी करण्यात, पचन सुधारण्यात व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते. योग्य वापर आरोग्यास फायदेशीर ठरतो.
javitri helps boost metabolism and control appetite
javitri helps boost metabolism and control appetiteFreepik
Published On

भारतीय मसाल्यांमधील अनेक मसाले आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जातात. त्यातील जावित्री हा एक असा मसाला आहे जो शरिरीक आरोग्य आणि वजन नियंत्रीत ठेवण्यास अतिशय उपयोगी पडतो. त्यातील पोषक तत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराची रोगप्रतीकार शक्ती वाढवतात. शिवाय यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. रोजच्या आहारात जावित्रीचा समावेश असल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

javitri helps boost metabolism and control appetite
Hemoglobin Deficiency: शरीरात रक्ताची कमतरता जाणवतेय? स्वयंपाकघरातील हा पदार्थ नक्की खा

जावित्री पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम औषध मानले जाते. यामधील जीवनसत्त्वे पचन सुधारतात, पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांना दूर करतात. जावित्रीमध्ये हृदय निरोगी राखण्यासाठी आवश्यक असलेले पोटॅशियम खनिज असते. जे रक्तदाब नियंत्रीत ठेवते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयासंबंधीचे आरोग्य टाळता येतात. याशिवाय संधिवातासारख्या आजारांवरही जावित्री एक रामबाण उपाय ठरते. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जावित्री तणाव आणि चिंता दूर ठेवून मानसिक शांतता प्रदान करते.

जावित्रीमध्ये कफनाशक गुणधर्म असतात. पारंपारिक औषधांमध्ये खोकला-सर्दी कमी करण्यासाठी जावित्री गुणकारी ठरते. तज्ज्ञांच्या मते जावित्री चयापचय वाढवते ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. काही लोकांना असे आढळून आले आहे की, जावित्रीचे सेवन केल्याने जंक फूड आणि अतिप्रमाणात साखर असलेले पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. यामुळे वजन कमी करण्यास सोपे जाते.

javitri helps boost metabolism and control appetite
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

जावित्रीचे औषधी फायदे मिळवण्यासाठी अशाप्रकारे उपयोगात आणा :

१. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात जावित्री पूड, चवीनूसार लिंबू आणि मध घालून जावित्रीचा चहा तयार करा.

२. पचन सुधारण्यासाठी जेवणामध्ये चवीसाठी जावित्री मसाल्याचा वापर करा.

३. शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी कोमट दूधात चिमूटभर जावित्री पूड घालून प्या.

javitri helps boost metabolism and control appetite
पोटाचे टायर्स दिसतात, शरीर सुटतच चाललंय? पाण्यात मिसळा '१' पदार्थ, बाबा रामदेव सांगतात झरझर घटेल वजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com