Walking after dinner: मासिक पाळी अनियमित आहे? रात्रीच्या जेवणानंतर १५ मिनिटं चालण्याची सवय ठरू शकते फायदेशीर

Post meal walk benefits: रात्रीच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटे चालल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून हार्मोनल संतुलन, मासिक पाळीची नियमितता आणि प्रजनन आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Irregular Menstruation
Irregular Menstruationsaam tv
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला PCOS, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली महत्त्वाची ठरते. तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या जेवणानंतर फक्त 15 ते 20 मिनिटे चालण्याची सवय लावल्यास शरीराच्या चयापचय प्रक्रियेला तसेच प्रजनन आरोग्याला मोठा फायदा होऊ शकतो.

जेवणानंतर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या वाढते. यावेळी हलका शारीरिक व्यायाम, विशेषतः चालणं, स्नायूंना ग्लुकोज अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याचा धोका कमी होतो आणि इन्सुलिनचं प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Irregular Menstruation
Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

इन्सुलिन रेझिस्टन्स ही PCOS च्या प्रमुख कारणांपैकी एक मानलं जातं. शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं. याचा परिणाम ओव्ह्युलेशन आणि मासिक पाळीच्या नियमिततेवर होऊ शकतो. त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारल्यास हार्मोनल संतुलन राखण्यास मदत मिळू शकते.

जेवणानंतर नियमित चालण्याचा सल्ला

विविध संशोधनांमध्ये जेवणानंतर नियमित चालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही अभ्यासांनुसार, ही साधी सवय रक्तातील साखरेचं नियंत्रण सुधारण्यास आणि शरीराची चयापचय क्रिया अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करू शकते.

Irregular Menstruation
Stomach cancer symptoms: पोटदुखी समजून दुर्लक्ष करू नका, पोटाच्या कॅन्सरची ही ७ लक्षणं वेळीच ओळखा!

संशोधनांमध्ये काही महत्त्वाचे फायदेही समोर आलेत. यामध्ये जेवणानंतर रक्तातील साखरेचं अधिक चांगलं नियंत्रण, इन्सुलिनची अचानक वाढ कमी होणं, मासिक पाळी अधिक नियमित होण्यास मदत आणि एकूणच चांगलं चयापचय आरोग्य यांचा समावेश आहे.

तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या जेवणानंतर चालण्यामुळे स्नायू ग्लुकोज अधिक प्रभावीपणे शोषून घेतात. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होण्यास मदत होते. याचा सकारात्मक परिणाम हार्मोनल संतुलनावर होऊन शरीरातील विविध बायोलॉजिकल प्रोसेस सुरळीत राहू शकतात.

Irregular Menstruation
Stomach cancer symptoms: शरीरात हे 4 बदल दिसले तर समजा पोटाचा कॅन्सर झालाय, लक्षणं ओळखणं फारच कठीण

अंडोत्सर्जन आणि प्रजनन क्षमता या गोष्टींचा इन्सुलिन आणि चयापचय यांचा संबंध जवळचा असतो. त्यामुळे दररोज जेवणानंतर काही मिनिटं चालण्यासारखी साधी सवयही महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषतः PCOS असलेल्या महिलांसाठी हा एक सोपा आणि प्रभावी जीवनशैलीतील बदल मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com