दररोज १०,००० पावले चालणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

Health Benefits of Walking 10,000 Steps Daily: दररोज १०,००० पावले चालणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या चालण्याचे आरोग्यदायी फायदे, वयानुसार योग्य पावले आणि महत्त्वाच्या फिट्नेस टिप्स.
Health Benefits of Walking 10,000 Steps Daily
Health Benefits of Walking 10,000 Steps DailySaam Tv
Published On: 

आजकाल अनेकजण फिटनेसप्रेमी नियमित चालण्याचा सोपा व्यायाम प्रकार करतात. अनेकजण नियमितपणे १०,००० पावले चालतात. असं म्हणतात १०,००० पावले चालल्याने वजन नियंत्रणात राहतो, रक्तदाब सुधारतो परंतु खरंच १०,००० पावले चालल्याने आरोग्याला फायदा होतो का? नियमितपणे १०,००० चालणे योग्य आहे का? हे देखील समजून घेणे महत्वाचे आहे.

Health Benefits of Walking 10,000 Steps Daily
वॉशिंग मशीनमध्ये साड्या धुवाव्यात की नाही?

वैद्यकीय सल्ल्यानुसार,नियमित चालणे हे शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर आहे. परंतु हे प्रत्येकाचे वय, जीवनशैली आणि आरोग्याची स्थिती यावर अवलंबून आहे.

अनेकांच्या मते, कमी पावले चालल्यानेही आरोग्याला चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १०,००० पावले चालल्याचा नेमका काय फायदा होतो असा प्रश्न निर्माम झाला आहे.

१०,००० पावले चालण्याचे फायदे

  • वजन जलदगतीने कमी होऊ शकते

  • हृदयाचे आरोग्य सुधारते

  • रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत

  • तणाव आणि चिंता कमी करते

  • झोपेची गुणवत्ता सुधारते

  • शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत

Health Benefits of Walking 10,000 Steps Daily
Chashma Cleaning Tips: चष्मा स्वच्छ कसा करायचा? जाणून घ्या

तज्ञांच्या मते, प्रत्येकासाठी १०,००० पावले चालणे आवश्यक नाही. मात्र माहितीनुसार, दररोज ६,००० ते ८,००० पावले चालणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितपणे सक्रिय असणे महत्वाचे आहे.

कोणाला होतो अधिक फायदा

  • जे लोक ऑफिसमध्ये बराच वेळ बसून काम करतात

  • ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे

  • मधुमेह आणि रक्तदाबाचे रुग्ण

  • वृद्ध व्यक्ती, ज्यांना व्यायामाची गरज असते

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.