Dough Fridge Container : फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ आरोग्यासाठी किती हानिकारक असतं? तज्ज्ञांचं मत एकदा नक्की वाचा

Leftover Atta Use : फ्रिजमध्ये पीठ ठेवणं घातक आहे का? पोषणतज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीनं साठवल्यास फ्रिजमधील पीठ सुरक्षित आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि आरोग्यदृष्टीने फायदे.
refrigerated dough safety
refrigerated dough safetygoogle
Published On
Summary
  1. फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी नसते, योग्य पद्धतीने साठवण आवश्यक आहे.

  2. पोषणतज्ज्ञ म्हणतात की ताजं पीठ सर्वोत्तम, पण फ्रिजमधील पीठसुद्धा सुरक्षित असते.

  3. थोडं तेल लावून हवाबंद डब्यात ठेवले तर ऑक्सिडेशन होत नाही.

  4. पीठ खराब झाले असेल तर त्याचा वापर टाळावा; शक्य असल्यास २४ तासात वापरून टाका.

दैनंदिन जेवणात चपात्यांचा समावेश हा असतोच. अनेक घरांमध्ये दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी रोज चपात्या बनवल्या जातात. मात्र, रोज ताजं पीठ मळणं शक्य नसल्याने अनेकजण एकावेळी जास्त पीठ तयार करून ते फ्रिजमध्ये ठेवतात. काहीवेळा उरलेलं पीठ देखील पुढील वेळी वापरण्यासाठी साठवले जातं. मात्र, अशा फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाबद्दल अनेक शंका आणि गैरसमज आहेत. काही लोकांचा दावा आहे की फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी बनते, तर काहींच्या मते त्याचं पोषणमूल्य कमी होतं. या सगळ्यात खरं काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपण तज्ज्ञांचे मत जाणून घेणं गरजेचं आहे.

पोषणतज्ज्ञांच्या मते, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ विषारी बनते ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. खरं तर, फ्रिजमधील तापमान सुमारे ४ अंश सेल्सियसच्या आसपास असते, जे बॅक्टेरियांच्या वाढीस आळा घालते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवलेले पीठ सुरक्षितच असते. मात्र, यामध्ये ‘योग्य साठवण’ ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तज्ज्ञ सांगतात की, पीठ हवाबंद डब्यात थोडंसं तेल लावून ठेवावं. यामुळे त्यावर कोणताही ऑक्सिडेशनचा परिणाम होत नाही आणि त्याचा ताजेपणा टिकून राहतो.

refrigerated dough safety
Lokmanya Tilak Punyatithi : टिळक कोण होते? ५ मिनिटांत जाणून घ्या त्यांचे योगदान, विचार आणि लढा

तसेच, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ पोषणदृष्ट्याही हानिकारक नसते. लोकांमध्ये असा गैरसमज आहे की अशा प्रकारे साठवलेले पीठ त्यातील प्रथिने, फायबर आणि इतर पोषक घटक गमावते. मात्र पोषणतज्ज्ञ याला नकार देतात. त्यांच्यानुसार, या पिठातील प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर हे ताज्या पिठाइतकेच टिकून राहतात. एवढंच नाही तर, काही अँटीऑक्सिडंट्स (जसे की फेरुलिक अॅसिड) अधिक प्रभावीपणे शरीरात शोषले जातात.

refrigerated dough safety
Rava Modak Recipe : साखर-खवा न घालता बनवा बाप्पाच्या नैवेद्यासाठी रव्याचे मोदक रेसिपी

तरीही, काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन केल्यास धोका अजून कमी करता येतो. उदाहरणार्थ, पीठ नेहमी फ्रिजच्या मुख्य भागात ठेवावं. फ्रिजच्या दाराजवळ ठेवणं टाळावं, कारण तिथे तापमानात चढ-उतार होत राहतो. पीठावर जर काळसर थर आला असेल किंवा त्याची पोत बदलली असेल तर त्याचा वापर टाळावा. शक्य असल्यास, मळलेलं पीठ २४ तासांच्या आत वापरण्याचा प्रयत्न करावा. एकूणच, फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ विषारी असल्याचा समज चुकीचा असून, योग्य पद्धतीने साठविल्यास ते सुरक्षित, पोषक आणि वापरण्यायोग्य राहते. त्यामुळे या मिथकांपासून दूर राहा आणि थोडं नियोजन करून तुमचं पीठ योग्यरित्या साठवा.

Q

फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ खरंच विषारी असते का?

A

नाही, पोषणतज्ज्ञांच्या मते योग्य साठवण केल्यास ते पूर्णपणे सुरक्षित असते.

Q

पीठाचे पोषणमूल्य फ्रिजमुळे कमी होते का?

A

नाही, प्रथिने व फायबरमध्ये फारसा फरक पडत नाही. काही अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रभावी होतात.

Q

पीठ कसे साठवावे?

A

थोडं तेल लावून हवाबंद डब्यात ठेवा आणि फ्रिजच्या मुख्य भागातच साठवा.

Q

कोणत्या लक्षणांवरून पीठ खराब झाले आहे हे ओळखावे?

A

पीठ काळं पडले असेल, पोत पातळ असेल, तर ते वापरू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com