

Ginger In Fridge : आलं हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थांची चव वाढवण्यापासून ते अनेक आजारांवर बहुगुणी ठरते. आल्यापासून आपल्याला विविध प्रकारच्या पदार्थांची चवही चाखता येते जसे की, आल्याची पेस्ट, आल्याची गोळी, सुंठ, आलं पावडर इत्यादी.
परंतु, हल्ली बाजारात आल्याची (Ginger) पेस्ट सहज मिळते. दररोजच्या कामच्या वेळी घाई होऊ नये म्हणून गृहिणी याची पेस्ट देखील बनवून ठेवतात. बरेचदा आपण आल्याची कांदा-लसूण-बटाटासारखी साठवणूक करण्याचा प्रयत्न करतो. साठवणुकीसाठी व सुकून जावू नये, खराब होऊ नये याकरिता फ्रिजमध्ये ठेवतो पण आलं अशाप्रकारे स्टोअर करणे योग्य आहे का? आरोग्यासाठी हे खरेच हेल्दी (Healthy) असते का ? जाणून घेऊया साठवणूकीची योग्य पद्धत.
1. खोलीच्या तापमानात आले साठवावे
जर तुम्हाला एक ते दोन आठवडे आले टिकवून ठेवायचे असेल तर आपण ते सामान्य खोलीच्या तापमानात ठेवू शकता. फक्त असे करताना आले ठेवलेल्या जागी ऊन येणार नाही याची काळजी घ्यावी. थंड आणि कोरड्या जागी आले साठवल्यास ते अधिक काळ टिकते. आले ओलसर ठिकाणी ठेवल्यास त्याला बुरशी लागू शकते.
2. आले फ्रिजमध्ये साठवू शकता का ?
जर तुम्हाला आले अधिक काळ साठवायचे असेल किंवा तुमच्याकडे अधिक प्रमाणात आले असेल तर, तुम्ही त्याला फ्रिजमध्ये (Fridge) साठवू शकता. परंतु आले फ्रिजमध्ये अधिक काळ ठेवल्यास ते सुकण्याची शक्यता असते. त्याचा दमट वातावरणाशी संपर्क आल्यास खराब देखील होऊ शकते. हे टाळण्यासाठी आले प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवा बंद कंटेनरमध्ये साठवावे.
3. अशा पद्धतीने साठवू शकता आलं
१. आलं साठवण्यासाठी तुम्ही झिप लॉक पिशवीचा वापर करू शकता. फ्रिजमध्ये किचन पेपर (टिशू पेपर)ठेवून त्यावर साठवू शकता. यामुळे आले अधिक काळ टिकून राहाते.
२. जर आल्याचा तुकडा सोलून ठेवलेले असेल किंवा किसलेले असेल तर ते लगेच वापरावे कारण, अर्धे कापलेले आले लवकर खराब होण्याची शक्यता असते.
३. आले साठवण्याची आणखी एक पद्धत म्हणजे, तुम्ही आल्याची पेस्ट तयार करून त्या पेस्टला आईस क्यूबच्या ट्रेमध्ये घाला. आल्याच्या रसापासून आईस क्यूब तयार करून ठेवू शकता आणि तुमच्या सोयीनुसार वापरू शकता.
४. जर आलं सुकले असेल तर त्याची पूड करून देखील तुम्ही साठवू शकता व वापरू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.