Liver Cancer Risk: कंबरदुखी वाढत चाललीये? लिव्हर कॅन्सरचा धोका नाही ना? वाचा लक्षणे

Back Pain: कंबर किंवा पाठदुखी ही साधी समस्या वाटत असली तरी ती लिव्हर कॅन्सरची लक्षणे असू शकतात. बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर आणि धुम्रपान कॅन्सरचा धोका वाढवतात.
Liver Cancer Risk
Back Painsaam tv
Published On
Summary

कंबर दुखी आणि थकवा ही लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

लठ्ठपणा, धुम्रपान आणि हाय ब्लड प्रेशर यामुळे लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो.

लिव्हर पेशींची अनियंत्रित वाढ ही या आजाराची मूळ कारणे आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याची सवयी सुद्धा बदलतात. त्यामुळे डायबिटीज, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, व्यायाम टाळणे, धुम्रपान करणे या सवयींमध्ये वाढ होते. यामुळे तुम्हाला लिव्हर कॅन्सरच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आतंरराष्ट्रीय आरोग्यतज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत हा आजार दुप्पट वाढू शकतो. त्यामुळे त्याची वेळीच लक्षणे ओळखून उपचार करणे गरजेचे आहे.

कॅन्सर होण्याची प्रमूख कारणे

लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल, धुम्रपान, औषधांचा गैरवापर आणि पाणी यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यातीलच गंभीर लक्षण म्हणजे लघवीतून रक्त येणे. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका असू शकतं. यामध्ये तुम्हाला वेदना होत नाहीत म्हणून तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर हा धोका तुमच्या जीवावर बेतू शकतो.

Liver Cancer Risk
Chanakya Niti: या मार्गाने कमवलेल्या पैशांनी कधीच सुख-समुद्धी नांदत नाही, चाणक्यांनी काय सांगितले कटू सत्य?

लिव्हर कॅन्सरमध्ये लिव्हरमधील पेशींची मोठ्या संख्येने वाढ होते. ती पुढे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत जाते. याचे रुपांतर कॅन्सरमध्ये होते. याची हालचाल किंवा वाढ तुम्हाला सहज जाणवत नाही. याची लक्षणे वेगळी असतात.

कॅन्सरच्या लक्षणांमध्ये पाठ दुखी, कंबरदुखी, भूक न लागणे, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, ताप येणे ही लक्षणे जाणवतात. या सामान्य वाटणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला भविष्यात मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागू शकते.

Liver Cancer Risk
Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com