Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांच्या मते जर पैसा हवा असेल तर माणसाने तो प्रामाणिकपणे मिळवावा. कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा आपल्याला कधीच पूरत नाही. तसेच भविष्यात गरिबीला सामोरे जायला पार पाडतो.
आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते, हे प्राचीन भारतातील महान अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकारणी आणि शिक्षक होते.
चाणक्य नीती या ग्रंथात जीवन सुखी, यशस्वी आणि नैतिक बनवण्यासाठी अनेक अमूल्य विचार दिले आहेत. त्यात त्यांनी "धन" कसं कमवायचं आणि कसं वापरावं याच्या सिक्रेट टिप्स दिल्या आहेत.
फसवणूक, धोका किंवा इतरांचा हक्क हिरावून मिळवलेले पैसे क्षणीक सुख देतात. त्याने भविष्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
जे धन अन्याय, अत्याचार किंवा वाईट कृत्यांमधून मिळतं ते शेवटी तुमचा नाश करतं. जर पैसा कमवताना आत्मसन्मान गमवावा लागत असेल, तर तो पैसा दुःखाचं कारण बनतो.
तिजोरीत बंद असलेलं धन समाजाच्या विकासात कधीच उपयोगी पडत नाही.
परिश्रमाशिवाय मिळालेला पैसा लवकर खर्च होतो आणि आनंद देत नाही. कष्टाने कमावलेला पैसा हा आयुष्यभर पूरतो.
वाईट मार्गाने कमावलेल्या पैशामुळे समाजाचं नुकसान होतं. अशा पैशातून संघर्ष वाढतो आणि समाजात अस्थिरता निर्माण होते.
चाणक्य म्हणतात, संपत्तीचा काही भाग नेहमी दान, शिक्षण आणि परोपकारासाठी वापरा. ज्याचं धन समाजासाठी उपयोगी नाही, तो माणूस गरीबच राहतो.