Healthy Chaat: चटकदार अन् कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेय? जंक फूड सोडा, घरीच तयार करा 'हा' पदार्थ, लहान मुलंही आवडीनं खातील

Homemade Snacks: जंक फूडला विसरा! घरच्या घरी तयार करा पाच चविष्ट आणि पौष्टीक चाट रेसिपीज. वजन न वाढवता क्रेविंग पूर्ण करणारा हा हेल्दी स्नॅक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
junk food alternatives
healthy chaat recipesaam tv
Published On
Summary

जंक फूडऐवजी घरच्या चाट रेसिपी उत्तम पर्याय आहेत.

फायबर आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

लहान मुलांसाठीही हा पौष्टीक आणि चविष्ट पर्याय आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना बाहेरचे जंक फूड खावे लागतात. याचा परिणाम तुमच्या हेल्दी आरोग्यावर होतो आणि भविष्यात तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. पण बऱ्याचदा घरचं खाणं कंटाळवाणं वाटत असतं. याचाच विचार करून आम्ही तुमच्यासाठी काही चटपटीत हेल्दी रेसिपी घेऊन आलो आहोत. त्याने तुमच्या क्रेविंग्स पूर्ण होतील आणि तुम्हाला वजनाच्या समस्यांनाही सामोरं जावं लागणार नाही.

१. भाजलेले चणे (Roasted Chana)

फार पूर्वीपासून लोक चणे खाणं जास्त पसंत करतात. पुर्वी खाण्यासाठी कुरकुरे किंवा वेफर्स नसायचे. त्यावेळेस लोक क्रेविंग म्हणून शेंगदाणे खात असत. कारण चण्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते पोट जास्त वेळ भरून ठेवतात आणि जंक फूड खाण्याची इच्छा कमी करतात. याला चटपटीत करण्यासाठी तुम्ही थोडे मीठ, काळी मिरी आणि चाट मसाला टाकून सर्व्ह करू शकता.

junk food alternatives
Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

२. मूग डाळ चिल्ला (Moong Dal Chilla)

बऱ्याच रोज पोळी भाजी खावून कंटाळा येतो. तसेच चहासोबत रोज पोहे खाऊन कंटाळा असेल तर मूग डाळ चिल्ला बेस्ट ऑप्शन आहे. हा डोश्यासारखा दिसतो पण तो डाळीचे पीठ बनवून केला जातो. यामध्ये पनीर, गाजर, कांदा आणि शिमला मिरचीसारख्या भाज्या घालून तो आणखी हेल्दी बनवू शकता. यामध्ये प्रोटीन आणि आर्यन असते जे मुलांच्या वाढत्या वयांसाठी हे खूप फायद्याचं ठरतं.

३. भेळपूरी किंवा कुरमुरे नाश्ता (Bhel or Spicy Murmura)

संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली की तळलेल्या पदार्थांऐवजी भेळपूरी किंवा मसालेदार कुरमुरे बेस्ट ऑप्शन आहे. यात तेलाचे प्रमाण कमी असते. कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, हिरवी चटणी आणि थोडासा गूळ मिक्स तयार केलेली भेळ कमी कॅलरीत बेस्ट ठरते.

४. रताळ्याचा चाट (Sweet Potato Chaat)

रताळे उकडून किंवा भाजून त्याचा चाट बनवणे हा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. हे बटाट्याच्या चिप्स किंवा फ्रेंच फ्राइजपेक्षा खूप चांगले आहे. रताळ्यात व्हिटॅमिन A आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात आणि ते नैसर्गिकरीत्या गोड असल्याने साखर घालण्याची गरज नसते. लिंबू, काळं मीठ आणि जिरेपूड घालून बनवलेला रताळ्याचा चाट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.

५. फळ आणि दह्याचे रायते (Fruit Yogurt Raita)

गोड खाण्याची इच्छा झाली की चॉकलेट किंवा बिस्किटऐवजी फळे आणि दही एकत्र करून एक टेस्टी आणि हेल्दी स्नॅक तयार करा. दह्यात केळं, स्ट्रॉबेरी किंवा इतर आवडीची फळं घालून स्मूदी किंवा रायते बनवा.

junk food alternatives
Sunday Horoscope: या राशीच्या बॅंक बॅलेन्समध्ये वाढ होईल, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com