Sakshi Sunil Jadhav
व्यवसायामध्ये शोध आणि प्रतिशोध यामध्ये अडकून राहाल. भावंडांचे सौख्याने मात्र आपल्याला भक्कम पाठिंबा मिळेल.वाहनावरची गती आज विशेषत्वाने टाळावी.
घरातील मंडळींची एखादे महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी सगळेजण एकत्र याल.महत्त्वाचे बैठका पार पडतील. दिवस चांगला आहे.
आपला प्रभाव इतरांवर राहील.सहज बोलून, हसून, खेळून दिवस घालवण्याचा आज आपला मानस असेल. अनेक ठिकाणी पाय ठेवून काम आज टाळा.
मनस्वास्थ्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणे आज गरजेचे आहे. दवाखाने, हॉस्पिटल याच्यासाठी विनाकारण पैसे खर्च होतील.
लाभदायक घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. कानाशी निगडित विकार असतील तर आज विशेष काळजी घ्यावी लागेल.
बौद्धिक क्षेत्रातील लोकांना विशेष घोडदौड होण्याचा आजचा दिवस आहे. मनोरंजनात्मक क्षेत्रामध्ये प्रगती होईल.समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल.
जमिनीशी निगडित व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. भाग्य उजळेल पण चुकीच्या दृष्टीने मार्गक्रमण आज नको.लक्ष्मीची उपासना आपल्याला विशेष फलदायी ठरेल.
गुढ गोष्टींकडे ओढा वाढेल. अनेक दिवस साचून राहिलेल्या गोष्टींचा निचरा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वाणीने इतरांना दुखवू नका.
आज द्विस्वभाव मनस्थिती राहील. कामाच्या ठिकाणी निर्णय घेताना अवघड वाटेल. यासाठी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे जा तर मार्ग सापडेल.
आजोळी प्रेम वाढेल. मामाकडून काहीतरी लाभ होण्याची असू शक्यता आहे. कामाला गती असेल पण प्रगती नसेल.चिकाटीने कामे मात्र कराल.
दिवस सहज सुलभ आणि विनासायास आहे. विशेष अडचणी येणार नाहीत. जे ठरवाल ते होईल. विद्यार्जनासाठी दिवस चांगला आहे .
शेतीवाडी, गुरढोरे यांच्यापासून आज आपल्याला फायदा आहे. एकूणच भरभराट करून देणारा आजचा दिवस आहे. घरामध्ये खेळीमेळ्याचे वातावरण असेल.