Sakshi Sunil Jadhav
भारतातील हजारो वर्षांपुर्वी किल्ले हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. प्रत्येक किल्ल्याला एक वेगळा इतिहास आणि वास्तुकलेची शैली आहे.
मुळात भारत हा इतिहास, राजवंश आणि वास्तुकलेचा खजिना आहे. त्यात किल्ले हे आजही आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. चला जाणून घेऊया भारतातील काही सगळ्यात जुने आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या किल्यांची माहिती.
राजगड हा शिवाजी महाराजांचा पहिला राजधानी किल्ला होता. सुमारे १४ व्या शतकात बांधलेला हा किल्ला प्रचंड उंचीवर असून त्यावरून संपूर्ण सह्याद्रीचे दर्शन होते.
इ.स. ८ व्या शतकात बांधलेला हा किल्ला भारतातील सर्वात जुने किल्ल्यांपैकी एक मानला जातो. ग्वाल्हेर किल्ल्याला गिब्राल्टर ऑफ इंडिया असेही म्हटले जाते.
जोधपूरच्या या किल्ल्याची उभारणी इ.स. १४५९ मध्ये झाली. ४०० फुट उंच टेकडीवर असलेला हा किल्ला आपल्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे.
चोल साम्राज्याच्या काळात बांधलेला गिंगे किल्ला दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. याला ट्रॉय ऑफ ईस्ट असे म्हटले जाते.
कुतुबशाही राजवटीच्या काळात उभारलेला गोलकोंडा किल्ला १३ व्या शतकातला आहे. याच किल्ल्यातून जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याची कथा सुरू झाली. हा किल्ला तेलंगणा येथे आहे.
महाराणा प्रताप आणि राणी पद्मिनीच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला ७ व्या शतकात राजस्थान येथे बांधण्यात आला. युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
मुघल सम्राट शाहजहान यांनी १७ व्या शतकात बांधलेला हा किल्ला भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला याच ठिकाणाहून तिरंगा फडकवला जातो.
तमिळनाडूतील इ.स. ९व्या शतकात बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या काळात महत्त्वाचा ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम येथे काही काळ वास्तव्य करत होते.