Back Pain: कंबरेला जास्त वेदना होतायेत? 'हे' ५ घरगुती उपाय ठरतील खूप फायदेशीर

Lower Back Pain Home Remedies: पाठ दुखीची समस्या आता वाढत चालली आहे. त्यामुळे एका जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तींना याचा खूप त्रास होत आहे. यावर तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.
Lower Back Pain Home Remedies: पाठीच्या खालच्या बाजूला जास्त वेदना होतायेत? करा 'हे' 5 घरगुती फायदेशीर उपाय
Back Paingoogle
Published On

सध्यो लोक बराच वेळ एका ठिकाणी बसून काम करतात. एका जागी अधिक काळ बसून राहिल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान तुमच्या पाठीचं आणि कंबरेचं होवू शकतं. त्यामुळे तुम्ही काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही जर तासंतास एका जागेवर बसून काम करत असाल तर तुम्हाला पाठीच्या खालच्या बाजुच्या स्नायुंमध्ये जास्त वेदना होतील. यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

लोअर बॅक म्हणजेच तुमच्या कंबरेकडचा भाग तुम्हाला एका जागी बसल्यावर जास्त वेदना दायक असतो. त्याने तुम्हाला बसताना, उठताना किंवा झोपताना सुद्धा त्रास दायक ठरू शकतो. बऱ्याच लोकांना या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ही समस्या आता जे लोक तासंतास ऑफीसमध्ये त्यांच्यासाठी सर्वसामान्य आहे. चला तर यावर घरगुती उपाय कोणते हे जाणून घेऊया.

Lower Back Pain Home Remedies: पाठीच्या खालच्या बाजूला जास्त वेदना होतायेत? करा 'हे' 5 घरगुती फायदेशीर उपाय
Sugar Cravings: गोड खाण्याची इच्छा कमी करायचीये? मग 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

पाठीची मालिश करणे

जर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात जास्त वेदना होत असतील तर तुम्ही मालिश करू शकता. यासाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा वापर करू शकता. त्याने तुमच्या स्नायुंना आराम मिळतो. तसेच पाठीचं दुखणं सुद्धा कमी होतं.

पाठ सरळ ठेवणे

तुम्ही कोणत्याही हालचाली करताना पाठ सरळ ठेवणं गरजेचं असतं. त्यात तुम्ही जर जास्त वेळ बसून काम करणार असाल तर तुमची हमखास दुखेल. मात्र तुम्ही बसताना सरळ ताट बसाल तर तुम्हाला पाठीचा त्रास जास्त सहन करावा लागणार नाही.

नियमित व्यायाम करणे

तुम्ही नेहमी व्यायाम करणं खूप महत्वाचं असतं. त्याने तुमचे स्नायु आणखी बळकट होतात. वेदना कमी होतात. त्यासाठी तुम्ही विशेष व्यायाम करू शकता. त्यामध्ये स्ट्रेचिंग आणि पाठीचे स्नायु मजबूत होतील अशा व्यायामाचा वापर करू शकता.

शरीराला पुरेसा आराम देणे

तुम्ही सलग काही तास एका जागी बसाल तर तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूला जास्त प्रमाणात त्रास होतो. त्यावेळेस तुमचं कामचं जर अधिक काळ बसून करायचे असते तर तुम्ही पुरेसा आराम घेणं सुद्धा महत्वाचं असतं. त्याने तुमचा कामातील थकवा निघून जावू शकतो. तसचं तुम्ही एका जागी बसून न राहता कामाच्या ठिकाणी काही वेळ चालावे. त्याने तुम्हाला पाठीच्या दुखण्याला सामोरं जावं लागू शकणार नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Lower Back Pain Home Remedies: पाठीच्या खालच्या बाजूला जास्त वेदना होतायेत? करा 'हे' 5 घरगुती फायदेशीर उपाय
Sai Tamhankar: सईच्या सौंदर्याची जादू! चाहत्यांचे कौतुक काही थांबेना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com