IRCTC Tour : काय सांगता! EMI वर करता येणार देवदर्शन? बुकिंग प्रोसेस, हप्ता किती?

Religious Travel Tour : IRCTC नेहमीच आपल्यासाठी परदेशातील किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी विविध टूर पॅकेजेस आणत असते.
IRCTC Tour
IRCTC TourSaam TV
Published On

IRCTC Tour Package :

दिवाळीचा सण सुरु झाला की अनेकांना वेध लागते ते सुट्ट्यांचे. त्यानंतर सुरु होतो डिसेंबरचा महिना. गुलाबी थंडी आणि सुट्ट्यांमध्ये अनेकांना फिरण्याची हौस असते. नवीन वर्षाची सुरुवात आणि जुन्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी अनेक जण फिरण्याचा प्लान करतात.

अशातच IRCTC नेहमीच आपल्यासाठी परदेशातील किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी विविध टूर पॅकेजेस आणत असते. यावेळी डिसेंबर महिन्यात भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे कोलकता गंगासागर पुरी यात्रा आयोजित केली आहे. यामध्ये आपल्याला बैद्यनाथ, गया, पुरी, कोणार्क, गंगासागर, कोलकाता, वाराणसी आणि अयोध्यासारख्या ठिकाणांना भेट देता येईल. तसेच ही टूर ईएमआयवरही करता येणार आहे. बुकिंग प्रोसेस कशी असेल जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. या ठिकाणी फिरता येईल

या टूरमध्ये (Tour) पर्यटकांना बैद्यनाथ मंदिर, जसडीह, विष्णुपद मंदिर आणि गया येथील स्थानिक मंदिरे, जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क मंदिर, पुरीची स्थानिक मंदिरे, गंगासागर, काली मंदिर, कोलकाता, वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर या ठिकाणांना भेट देता येईल. तसेच रामजन्मभूमी, हनुमान गढी आणि विविध मंदिरांचे (Temple) दर्शन घेता येणार आहे.

IRCTC Tour
Most Dangerous Fort In Thane : ठाण्याच्या कुशीत वसलेला खतरनाक किल्ला, सह्याद्रीचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सना भुरळ

2. टूर कधी?

हे टूर पॅकेज ४ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. ९ रात्री १० दिवासांचे हे टूर पॅकेज असेल. तसेच या मध्ये बर्थची एकूण संख्या ७६७ आहे. ज्यामध्ये सेकंड एसीच्या एकूण ४९ जागा, थर्ड एसीच्या एकूण ७० जागा आणि स्लीपरच्या एकूण ६४८ जागा रिक्त मिळतील.

पर्यटकांना यामध्ये आगरा कँट, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई, ओराई, कानपूर, लखनौ, अयोध्या कँट, काशी आणि बनारस स्थानकांवरुन ट्रेनमध्ये चढता किंवा उतरता येईल. यामध्ये प्रवाशांना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. तसेच एसी आणि नॉन एसी बसने देखील प्रवास (Travel) केला जाईल.

IRCTC Tour
December Tour Package : IRCTC चा टूर धमाका! पार्टनरसोबत बजेटमध्ये फिरता येणार दार्जिलिंग-राजस्थान, बुकिंग कशी कराल?

3. टूर पॅकेजची किंमत

इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास) मध्ये प्रति व्यक्तीसाठी पॅकेजची किंमत १७५०० रुपये असेल. तर, लहान मुले(5-11 वर्षे) पॅकेजची किंमत १६,४०० रुपये असणार आहे. या कालावधीत, स्लीपर कोच ट्रेन प्रवास, नॉन-एसी हॉटेल, मल्टी- शेअर आणि नॉन-एसी वाहतुकीवर नॉन-एसी हॉटेल रूमची सुविधा मिळेल.

स्टँडर्ड क्लास थर्ड एसी क्लासमध्ये प्रति व्यक्तीसाठी पॅकेजची किंमत २८,३५० रुपये तर लहान मुलांसाठी (5-11 वर्षे २७,०१० रुपये असणार आहे. या पॅकेजमध्ये देखील राहाण्या-खाण्याची विशेष सोय असेल.

कम्फर्ट कॅटेगरी 2AC वर्गातील प्रति व्यक्तीसाठी पॅकेजची किंमत ३७,३०० रुपये तर लहान मुलांसाठी (5- 11 वर्षे) पॅकेजची किंमत ३५,७१० रुपये असणार आहे. या पॅकेजमध्ये देखील पर्यटकांची विशेष सोय केलेली आहे.

IRCTC Tour
Success Tips : सकाळच्या या ८ चांगल्या सवयींमुळे कठीण मार्ग होतो सोपा, मिळते घवघवीत यश

यामध्ये LTC आणि EMI चा हप्ता देखील भरता येणार आहे. हा हफ्ता ८४९ रुपयांपासून सुरु होईल. याची संपूर्ण माहिती IRCTC च्या वेबसाइटवर मिळेल. तसेच बुकिंग प्रोसेससाठी irctctourism.com. अधिकृत स्थळाला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com