गुलाबी थंडी आणि लाँग वीकेंड असेल तर फिरण्याचा प्लान हमखास बनतो. पुढच्या आठवड्यात २६ जानेवारीला लाँग वीकेंड आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे तुम्हाला ट्रिप प्लान करता येईल.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)बजेटमध्ये थायलंड टूर पॅकेज देत आहे. IRCTC तुम्हाला २४ जानेवारी २०२४ पासून थायलंडचे ६ दिवस ५ रात्रीचे टूर पॅकेज देत आहे. २६ जानेवारीच्या वीकेंडला २ दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही या ट्रिपचा आनंद घेऊ शकता. हे टूर पॅकेज कोलकाता पासून सुरु होईल. IRCTC मुंबई (Mumbai), लखनौ, कोलकाता येथून थायलंड टूर पॅकेज देत आहे.
1. व्हिसाशिवाय फिरा थायलंड
जर तुम्हालाही स्वस्तात मस्त परदेशातील टूर करायची असेल तर थायलंडची टूर करु शकता. भारतीयांना थायलंडमध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळत आहे. थायलंडमध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल मिळेल. यामध्ये तुम्हाला आगाऊ व्हिसा घेण्याची गरज नाही. थायलंड विमानतळावर पोहोचल्यानंतर तुमच्या पासपोर्टवर व्हिसाचा शिक्का मारला जाईल.
2. टूर पॅकेजमध्ये काय मिळेल?
थायलंड टूर पॅकेजमध्ये फ्लाइट, हॉटेल आणि जेवणाचा खर्च तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक खर्च करावा लागणार आहे. या टूर पॅकेजमध्ये स्थानिक प्रवासासाठी बससेवा दिली जाणार आहे. थायलंडचे हे टूर पॅकेज ५ रात्री ६ दिवसांचे असणार आहे. या पॅकेजमध्ये थायलंड, बँकॉक आणि पट्टाया फिरता येईल. तसेच यामध्ये स्थानिक टूर गाइड मिळेल.
3. कोलकाता ते थायलंड टूर पॅकेज
IRCTC थायलंड टूर पॅकेज कोलकाता येथून सुरु होईल. IRCTC च्या वेबसाइटनुसार एका व्यक्तीने प्रवास केला तर तुम्हाला ५६,१०० रुपये मोजावे लागतील.
कपल्ससाठी प्रत्येकाला ४९ हजार रुपये द्यावे लागतील. तसेच ३ जणांसाठी हे टूर पॅकेज घेतले असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी ४९ हजार रुपये भरावे लागतील. अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://irctctourism.com/ ला भेट देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.