IRCTC Tour: पावसाळ्यात अंदमानला जाण्याचा प्लान करताय? IRCTCचे खास पॅकेज; खर्च किती?

Andaman IRCTC Package: मे महिना संपत आला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात अनेकजण जास्त दिवस फिरायला जाण्याचा प्लान करतात. पावसाळ्यात सर्व ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असते.
IRCTC Tour
IRCTC TourGoogle

मे महिना संपत आला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात अनेकजण जास्त दिवस फिरायला जाण्याचा प्लान करतात. पावसाळ्यात सर्व ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असते. सगळीकडे हिरवी झाडी, झरे, धबधबे ओसंडून वाहत असतात. पावसाळ्यात अंदमान निकोबार या बेटांना तुम्ही नक्की भेट द्यायला हवी. तेथील निसर्गसौंदर्य लाभाला हवे. अनेकांचे अंदमानला फिरायला जाण्याचे स्वप्न असते. जर तुम्हालाही पावसाळ्यात अंदमानला भेट द्यायची असेल तर आयआरसीटीसीने नवीन पॅकेज टूर लाँच केली आहे.

सप्टेंबर महिन्यात आयआरसीटीसीने अंदमानला जाण्यासाठी ही टूर आयोजित केली आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला राहणे, खाण्यापिण्याची सोय असेल. आज आम्ही तुम्हाला आयआरसीटीसीच्या या नवीन पॅकेजची माहिती देणार आहोत.

आयआरसीटीसी टूर पॅकेज

ही ट्रिप ६ रात्री आणि ७ दिवसांची असणार आहे. या टूरमध्ये तुम्ही फ्लाइटने प्रवास करणार आहेत. या टूरमध्ये तुम्हाल हॅवलॉक, पोर्ट ब्लेअर या ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याचसोबत तुम्ही भुवनेश्वरदेखील फिरु शकता. २२ सप्टेंबर २०२४ रोजी अंदमान- निकोबारची ही ट्रीप सुरु होणार आहे. २२ सप्टेंबरपासून पुढील ७ दिवस या ट्रिपचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.

या ट्रिपमध्ये तुम्हाला जाण्या- येण्यासाठी इकोनॉमी क्लासची फ्लाइट तिकिटे मिळतील. ट्रीपमध्ये राहण्यासाठी एका चांगल्या हॉटेलमध्ये सुविधा करण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरची सुविधा मिळेल. याचसोबत ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळणार आहे.

या ट्रिपमध्ये जर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुम्हाला ७१,२५० रुपये द्यावे लागणार आहेत. तर तुम्ही दोन लोक ट्रॅव्हल करणार असाल तर प्रत्येकी ४९ हजार रुपये भरावे लागणार आहे. लहान मुलांसाठी तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागणार आहेत.

IRCTC Tour
Mango Pickle : आंबट-गोड कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं? वाचा परफेक्ट टिप्स

आयआरसीटीसी पॅकेज कसे बुक करु शकता?

आयआरसीटीसी पॅकेज तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन बुक करु शकतात. त्याचसोबत तुम्ही IRCTC पर्यटक सुविधा केंद्र किंवा प्रादेशिक कार्यांलयातून बुकिंग करु शकतात.

IRCTC Tour
Relationship Tips: महिलांच्या 'या' सवयींमुळे वैतागतात पुरुष; कमी करतात आदर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com