Mango Pickle Tips: आंबट-गोड कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं? वाचा परफेक्ट टिप्स

How to Preserve Pickle: लोणचं वर्षभर टिकणं गरजेचं आहे. मात्र काही ठिकाणी लोणचं काही महिन्यांनी खराब होतं. त्यामुळे आज लोणचं वर्षभर कसं टिकवायचं याची माहिती जाणून घेऊ.
Mango Pickle Tips: आंबट-गोड कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं? वाचा परफेक्ट टिप्स
Mango PickleSaam TV

जेवणासोबत लोणचं अनेकांना आवडतं. काही व्यक्तींना तर लोणचं इतकं आवडतं की ते नुसचं लोणचं सुद्धा खातात. सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे बऱ्याच घरी महिलांनी लोणचं बनवायला सुरूवात केली आहे. परफेक्ट रेसिपी फॉलो करून महिला लोणचं बनवतात. आता हे लोणचं वर्षभर टिकणं गरजेचं आहे. मात्र काही ठिकाणी लोणचं काही महिन्यांनी खराब होतं. त्यामुळे आज लोणचं वर्षभर कसं टिकवायचं याची माहिती जाणून घेऊ.

Mango Pickle Tips: आंबट-गोड कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं? वाचा परफेक्ट टिप्स
Mom’s Magic Pickle नं चाखली यशाची चव; फक्त ४००० रुपयांपासून व्यवसायची सुरूवात, आज दरमहा अडीच लाखांची कमाई

स्वच्छ भांडी

लोणचं जर वर्षभर टिकवायचं असेल तर आपण स्वच्छ भांडी वापरली पाहिजेत. स्वच्छ भांड्यांसाठी काचेची बरणी निवडा. या बरणीचे तोंड जास्त मोठे असावे. लहान असल्यास बरणी व्यवस्थित स्वच्छ करता येत नाही.

काचेची बरणी स्वच्छ करण्यासाठी आधी ती साबनाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गरम पाण्याने धुवून सुकवून घ्या. बरणी पूर्ण कोरडी करून घ्या. अस्वच्छ आणि त्यात पाणी असेल तर बरणी खराब होते.

मोहरीचं तेल

लोणचं कायम मोहरीच्या तेलात बनवतात. मोहरीच्या तेलात बनवलेलं लोणचं जास्त काळ टिकतं. काही व्यक्तींना मोहरीचं तेल आवडत नाही. या तेलाची चव आवडत नसल्याने काही जण विविध खाद्य तेलांचा वापर करतात. शेंगतेल, सुर्यफूल आणि सोयाबीनच्या तेलाचा वापर करतात. मात्र हे तेल कैरीसाठी पोषक नाही. त्यामुळे या तेलामध्ये लोणचं खराब होतं. त्याला काही महिन्यांतच बुरशी लागते.

वापरण्याची पद्धत

लोणचं तुम्ही ज्या बरणीत भरून ठेवलं आहे त्याला सतत हात लावू नये. काही व्यक्ती मोठ्या बरणीतून सतत लोणचं काढतात. त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे मोठ्या बरणीतून एका लहान भांड्यात आठ दिवसांसाठीचं लोणचं काढून ठेवावे. यासह लोणचं कायम थंड ठिकाणी ठेवलं पाहिजे. तसेच महिन्यातून ४ ते ५ वेळा त्याला कडक उन सुद्धा दाखवले पाहिजे.

हवाबंद डब्बा

काही व्यक्ती लोणचं प्लास्टीक किंवा स्टिलच्या भांड्यात ठेवतात. यातून लोणच्याला हवा लागण्याची शक्यताअसते. लोणचं कायम चिनीमातीच्या भांड्यात ठेवावं. चिनीमातीपासून बनलेली बरणी लोणच्यासाठी चांगली असते. ही बरणी सुद्धा हवाबंद आहे की नाही हे आधी तपासून घ्या. बरणी हवाबंद असल्याने त्यात लोणचं सहज वर्षभर टिकतं.

टीप : आंबट गोड लोणचं वर्षभर टिकण्यासाठी ही सामान्य माहिती आहे. या टिप्सने तुमचं लोणचं खराब होणार नाही, असा दावा साम टीव्ही करत नाही.

Mango Pickle Tips: आंबट-गोड कैरीचं लोणचं वर्षभर कसं टिकवायचं? वाचा परफेक्ट टिप्स
Monsoon Masala Preservation Tips: स्वयंपाकघरातील मसाल्यांना पावसाळ्यात बुरशी लागते ? याप्रकारे करा स्टोअर, वर्षभर टिकतील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com