Relationship Tips: महिलांच्या 'या' सवयींमुळे वैतागतात पुरुष; कमी करतात आदर

Relationship Tips For Married Couples: रिलेशनशिपला मजबूत करण्यासाठी जोडीदाराच्या गरजांची काळजी घेणे हाच उत्तम मार्ग आहे. पण पती-पत्नीच्या चुकीच्या सवयीमुळेही नात्यात दुरावा येऊ शकतो. चला जाणून घेऊया पत्नीच्या ५ वाईट सवयींबद्दल ज्यामुळे त्यांचे नाते तुटत असते.
Relationship Tips: महिलांच्या 'या' सवयींमुळे वैतागतात पुरुष; कमी करतात आदर
Relationship Tips For Married Couples

पती-पत्नीचं नातं हे एक नाजूक धाग्याने बांधलेले असते. या दोघांमधील छोटासा वादही त्यांच्यात दुरावा निर्माण करत असतो. जर जोडीदाराने त्याच्या जोडीदाराला वेळेत समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण होते. बहुतेक नात्यांमध्ये पुरुष पत्नीला आदर करत नाहीत. या चुकांमुळे त्यांचे पती त्यांचा आदर करत नाहीत. तसेच ते त्यांना कुठेच सोबत घेऊन जात नाहीत. बायकोच्या त्या ५ चुकीच्या सवयींबद्दल जाणून घेणार आहेत.

वाद

जेव्हा पत्नी आपल्या पतीसोबत नेहमी वाद घालत असते. तेव्हा पती वैतागतात आणि पत्नीसोबत प्रत्येक विषयावर वाद घालवत नसतात. तिचा आदर करणे सोडून देत असतात. अधूनमधून मारामारी किंवा वाद होणे हे सामान्य आहे, पण जेव्हा हे रोजचेच होऊ लागते, तेव्हा पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होत असते.

समजदारीपणा

साधारणपणे, पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो जेव्हा दोघांपैकी एकजण दुसऱ्याच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढत असतो. विशेषत: जेव्हा पत्नी पतीचे म्हणणे समजून घेण्याऐवजी दुर्लक्ष करू लागते, तेव्हा नवराही तिचा आदर करणे सोडून देतो.

आदर

पत्नी जेव्हा पतीचा आदर करत नाही तेव्हा पुरुषही त्यांच्या पत्नीचा आदर करत नाहीत. बहुतेकवेळा बायका कुटुंबीय आणि मित्रांसमोर त्यांच्या पतीचा अपमान करत असतात. त्यामुळे पुरुष होत ते पत्नीचा कुठेच आदर करत नाहीत. महिलांनो, तुम्हीही अशीच चूक होत असेल तर आजच तुमची सवय बदला. अन्यथा भविष्यात तुम्हा दोघांचे मार्ग कायमचे वेगळे होऊ शकतात.

नात्यातील प्रेम टिकवून ठेवण्याची जबाबदारी पती-पत्नी दोघांची असते. जोडीदारांनी दोघांनी एकमेकांचे म्हणणे ऐकले पाहिजे. दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे. पण बहुतेक वेळा पत्नी आपल्या पतीचं ऐकत नाहीत. तसेच जेव्हा त्यांची पत्नी प्रत्येक मुद्द्यावर त्याचे मत टाळू लागते आणि तिच्या इच्छेनुसार पतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा पती आपल्या पत्नीचा आदर करत नाहीत.

संशय

पती-पत्नीच्या नात्यात तडा येण्याचं आणखी एक कारण म्हणजे जेव्हा पत्नी छोट्या-छोट्या गोष्टींवर पतीवर संशय घेऊ घेते. त्यांना कुठेही एकटे राहू देत नाही. अशा परिस्थितीत पती इच्छा नसतानाही पत्नीचा आदर करत नाहीत.

Relationship Tips: महिलांच्या 'या' सवयींमुळे वैतागतात पुरुष; कमी करतात आदर
Relationship Tips : पार्टनरवर प्रेम आहे, पण सतत बोलण्याचा अन् भेटण्याचा कंटाळा आलाय; 'या' टिप्सने नातं पुन्हा पहिल्यासखं खुलेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com