IRCTC Tour Package : IRCTC चा नवा टूर प्लान! बजेटमध्ये फिरता येणार थायलंड, कशी कराल बुकिंग? जाणून घ्या सविस्तर

Lucknow To Thailand Trip : IRCTC नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी बजेट ट्रिप प्लान करत असते.
Lucknow To Thailand Trip
Lucknow To Thailand TripSaam Tv
Published On

Thailand Tour Package :

IRCTC नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी बजेट ट्रिप प्लान करत असते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC देशाच्या विविध भागात असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेजेस चालवत नाही. त्याशिवाय अनेक परदेशातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज सुरू केले आहे.

हे पॅकेज लखनऊच्या नवाबांच्या शहरापासून सुरु होणार आहे. स्पार्कलिंग थायलंड एक्स लखनऊ असे या पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजअंतर्गत आपल्याला थायलंडमध्ये ५ रात्री आणि ६ दिवस फिरण्याची संधी मिळेल. तसेच यात आपल्याला बँकॉक आणि पटाया या सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी देखील मिळत आहे. बुकिंग कशी कराल जाणून घेऊया सविस्तर

Lucknow To Thailand Trip
Highest Waterfall In Satara : डोंगरदऱ्यातून कोसळणारा साताऱ्यातील सगळ्यात उंच धबधबा पाहिलात का?

1. टूर पॅकेज सुविधा

या टूर (Tour) पॅकेजमधील प्रवाशांसाठी लखनऊ ते बँकॉक (थायलंड) आणि रिटर्न येण्यासाठी बँकॉक (थायलंड) ते लखनऊ थेट विमानाने करता येणार आहे. या पॅकेजमध्ये पर्यटकांना हॉटेल, विमानाचे तिकीट आणि खाण्यापिण्याची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच यात ब्रेकफास्ट, दुपार आणि रात्रीचे जेवण देखील मिळणार आहे. बुकिंग करण्यासाठी आपल्याला IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल.

2. टूर पॅकेजमध्ये काय मिळेल?

  • पॅकेजचे (Package) नाव – स्पार्कलिंग थायलंड लखनऊ (NLO08A)

  • कुठून मिळणार? – पट्टाया आणि बँकॉक

  • टूरची तारीख – 8 ते 13 डिसेंबर, 2023

  • टूर कालावधी – 6 दिवस/5 रात्री

  • जेवणाची सोय – ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

  • कसे जाल? – एअरपोर्ट ट्रॅव्हलिंग मोड

  • किती वेळ (Time) - लखनऊ विमानतळापासून 23:05 तास

Lucknow To Thailand Trip
Famous Travel Places In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

3. टूर पॅकेज किती आहे?

जर फिरण्यासाठी तुम्ही एकटे जात असाल तर तुम्हाला 69,800 रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही कपलने जात असाल तर प्रति व्यक्तीसाठी 60,300 रुपये आहे. याशिवाय तुम्ही 3 लोकांसोबत प्रवास केल्यासही तुम्हाला प्रति व्यक्ती 60,300 रुपये खर्च करावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, बेडसह 55,200 रुपये आणि 2 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, बेडशिवाय 51,100 रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com