वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येक नागरिक हैराण झालेला आहे. मात्र कोणताही ऋतू असो पर्यटकांची संख्या प्रत्येक पर्यटक स्थळी मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आता आमसुकच प्रत्येक व्यक्ती पावसाळ्या दरम्यान एखाद्या थंड आणि हिरव्यागार पर्यटन स्थळी जाण्याचा प्लॅन करतात. तर मग हा खास लेख त्याच पर्यटकांसाठी .पावसाळ्या दरम्यान पर्यटनासाठी जायचे एकदम उत्तम ठिकाण म्हणजे केरळ.
केरळ हे अनेक सुंदर समुद्र किनारे आणि उत्कृष्ट पर्यटन आणि निर्सगाने परिपूर्ण असलेले एक राज्य आहे. केरळ हे विविध सण (festival)आणि उत्सवासाठी प्रसिद्ध आहेच शिवाय सुंदर अशा पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. केरळला (Kerala)देवभूमी म्हणून ओळखले जाते शिवाय पर्यटनात जागतिक मानही केरळ राज्याला मिळाला आहे. चला तर पाहूयात केरळमध्ये भेट देण्यायोग्य पर्यटन स्थळ.
कोची
केरळमधील कोची या स्थळाला 'गेटवे टू केरळ' म्हणूनही ओळखले जाते. केरळमधील सर्वात चांगेल पर्यटन स्थळ म्हणूनही या ठिकाणाला ओळख आहे. कोची पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात.
मुन्नार
पावसाळ्यात केरळात जाताय तर आवर्जून मुन्नार येथे जावा. हिरवळीने नटलेला डोंगर पावसाळ्यात हे ठिकाण म्हणजे एक पर्यटकाना पर्वणी असते.
थेक्कडी
निसर्गप्रेमींसाठी थेक्कडी हे ठिकाण एका स्वर्गापेक्षा कमी नाही. पावसाळ्याच्या दिवसात केरळमधील या ठिकाणाला आवश्य भेट द्या.
वायनाड
केरळमधील वायनाड हे प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे येत असतात.
कोवलम
केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमपासून कोवलम हे ठिकाण साधारण १५ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.