मुंबई : देशात डायबेटीस रुग्ण एवढे प्रचंड वेगाने वाढताय ती आकडेवारी पाहून तुम्हीही चक्रावून जाल. कारण, भारतात तब्बल 10 कोटी 11 लाख लोक डायबेटीसग्रस्त झालेयत. तर प्री डायबेटीसग्रस्त 13 कोटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. प्री डायबेटीस म्हणजे पुढे डायबेटीस होणार असलेले रुग्ण ऐकून धक्का बसला असेल. मात्र, हे खरं आहे. गेल्या चार वर्षांत डायबेटीस रुग्णांमध्ये 44 टक्क्यांनी वाढ झाल्याचं मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन आणि आयसीएमआरने केलेल्या संशोधनात समोर आलंय. WHO ने 2 कोटी 50 लाख हे प्री डायबेटीस असतील असं म्हटलंय...मात्र, ICMRच्या संशोधनात 13 कोटी लोक प्री डायबेटीसग्रस्त असल्याची माहिती समोर आलीय.
देशात 10 कोटी लोक डायबेटीजग्रस्त, 13 कोटी प्री डायबेटीजग्रस्त आहेत. प्री-डायबेटीज असलेल्या 60% लोकांना पुढील 5 वर्षांत हा आजार होतो. भारतात गोव्यात सर्वाधिक म्हणजेच 26.4% रुग्ण डायबेटीजग्रस्त आहेत. पुद्दुचेरीमध्ये 26.3% तर केरळमध्ये 25.5% इतके रुग्णांना डायबेटीज झाल्याचे निदान झाले आहे. महाराष्ट्रातही लाखो रुग्ण डायबेटीजग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. डायबेटीज रुग्णांचं प्रमाण वेगानं वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. अनेकांना आपल्याला डायबेटीज झालंय का हेदेखील माहीत नसतं.
शरीरातील रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं.
स्वादुपिंड कोणतेही इंसुलिन किंवा पुरेसे इंसुलिन तयार करत नाही.
इन्सुलिन योग्यरित्या वापरण्यास असमर्थ असते तेव्हा डायबेटीज होतो.
बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, तणाव यामुळे डायबेटीज होतो.
डायबेटीजची लक्षणे काय?
वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे
पूर्ण झोपेनंतरही थकवा जाणवणे
वारंवार भूक लागणे, दृष्टी कमी होणे
जखम लवकर बरी न होणे
अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने आपण अनेक आजारांचा धोका कमी करू शकतो. डायबेटीजही हा अनुवांशिक कारणांमुळे देखील होतो. त्यामुळे काहीवेळा तो रोखणे कठीण जातं. मात्र, सावधगिरी बाळगली, डॉक्टरांचा सल्ला घेतला तर डायबेटीज रोखता येतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.