Blood Sugar : 'हे' पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता, लक्ष द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साखर का वाढते?

आपल्या शरीरात साखर वाढण्याची समस्या कशामुळे होऊ शकते? हे आपण जाणून घेणार आहोत.

बटाटे खाणं टाळा

भारतीय स्वयंपाकघरात बटाट्याचा वापर केला जातो. पण त्यात कार्बोहायड्रेट आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

साखरेचे पदार्थ खाणं टाळा

साखर आणि साखरेपासून बनवलेले पदार्थ खाणं टाळावं. यामध्ये साखर आणि कार्ब्सचं प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

सॉफ्ट ड्रिंक्स टाळा

सॉफ्ट ड्रिंक्स हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी हानिकारक आहे. यामुळे साखर वाढण्याची दाट शक्यता असते.

मिल्क शेक पिणं टाळा

मधुमेहाच्या रुग्णांनी मिल्क शेकचं सेवन टाळलं पाहिजे. निरोगी दिसणाऱ्या या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असतं.

फ्लेवर्ड दही

फ्लेवर्ड दह्यामध्ये कार्ब्स आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे याचं सेवन करणंही टाळावं.

येथे वाचा- Blood Colour : आपल्या शरीरातील रक्ताचा रंग लाल का असतो? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण