Sultan Hassanal Bolkiah : 1700 खोल्या, सोन्याचा महाल, 7 हजार गाड्या; ब्रुनेईच्या सुलतानाचा राजेशाही थाट पाहिलात का? VIDEO

sultan hassanal bolkiah net worth : ब्रुनेईच्या सुलतानाचा राजेशाही थाटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या राजाकडे 1700 खोल्या, सोन्याचा महाल, 7 हजार गाड्या आहेत.
 1700 खोल्या, सोन्याचा महाल, 7 हजार गाड्या; ब्रुनेईच्या सुलतानाचा राजेशाही थाट पाहिलात का? VIDEO
Sultan Hassanal BolkiahSaam tv
Published On

नवी दिल्ली : महालात 1700 खोल्या, 7 हजार गाड्या आणि सोन्याचा मुलामा असलेलं प्लेन ही एका ब्रुनेईच्या सुलतानाची संपत्ती आहे. या ब्रुनेईच्या सुलतानाची सर्वत्र चर्चा होत आहे. या सुलतानाचं साम्राज्य डोळे दिपवणारं आहे. राजेशाही थाट जगणारा सुलतान कोण आहे, याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या राजाला नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. त्यानंतर या राजाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

ब्रुनेईच्या सुलतानचा हजारो एकरावर सोन्याचा महाल आहे. या राजाकडे तब्बल 7 हजार गाड्या आहेत. हे साम्राज्य ब्रुनेईच्या सुलतानाचं आहे. हसनल बोल्किया असं ब्रुनेईच्या राजाचं (Brunei Sultan) नाव आहे. साम्राज्य पाहून डोळे चक्रावतील, असं या राजाचा महाल आहे.

कोण आहे ब्रुनेईचा सुलतान?

हसनल बोल्किया असं ब्रुनेईच्या राजाचं नाव आहे. ब्रुनेई देशाला 1984 साली स्वातंत्र्य मिळालं. हसनल बोल्किया 59 वर्षांपासून सम्राट आहे. ब्रुनेईचा सुलतान लग्जरी लाईफ जगतोय.

ब्रुनेईच्या सुलतानाचा राजेशाही थाट कसा आहे?

हसनल बोल्कियांचा 1700 खोल्यांचा महाल आहे. या राजाचा महाल हजारो एकरमध्ये पसरला आहे. महालात अनेक वस्तू सोन्याच्या आहेत. सोन्याचा मुलामा चढवलेलं एक प्राइवेट प्लेन आणि सोन्याची कारही आहे. जगातील सर्वात जास्त कारचा संग्रह म्हणजे तब्बल 7 हजार कार राजाच्या महालात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या देशातील महागड्या गाड्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ब्रुनेई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ब्रुनेईच्या राजाची भेट घेतली. त्यामुळे ब्रुनेईचा सुलतान जोरदार चर्चेत आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com