Air cooler Vastu: घरात कूलर कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, 'या' चुका करणं टाळा

वास्तुशास्त्रानुसार घरात कूलर कोणत्या दिशेला ठेवावा? उत्तर, उत्तर-पश्चिम आणि पूर्व दिशेचे महत्त्व जाणून घ्या. आग्नेय दिशेला कूलर ठेवणे का टाळावे, तसेच कूलरची स्वच्छता आणि पाणी बदलताना कोणती काळजी घ्यावी, हे वाचा.
Air cooler Vastu
Air cooler Vastusaam tv
Published On: 

उन्हाळा सुरू झाला की घरात थंडावा मिळावा म्हणून अनेक जण एअर कूलरचा वापर करतात. कमी खर्चात घर थंड ठेवण्यासाठी कूलर हा एक चांगला पर्याय मानला जातो. मात्र वास्तुशास्त्रानुसार, घरात कूलर कोणत्या दिशेला ठेवला आहे यालाही महत्त्व आहे.

कूलरमध्ये पाणी आणि हवा या दोन्हींचा वापर होत असल्याने त्याचा संबंध या दोन घटकांशी जोडला जातो. वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, योग्य दिशेला कूलर ठेवल्यास घरात सकारात्मक वातावरण राहतं. तर चुकीच्या दिशेला ठेवल्याने काही अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे.

उत्तर-पश्चिम दिशा कूलरसाठी योग्य

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य कोपऱ्यात कूलर ठेवणं चांगलं मानलं जातं. ही दिशा वायू तत्त्वाशी संबंधित असल्याची मान्यता आहे. या दिशेला कूलर ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कुटुंबातील सदस्यांना प्रगतीच्या संधी मिळतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

उत्तर दिशेलाही ठेवू शकता कूलर

वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर आणि जलतत्त्वाशी संबंधित मानली जाते. कूलरमध्ये पाण्याचा वापर होत असल्याने या दिशेला कूलर ठेवणं शुभ मानण्यात आलं आहे. या दिशेला कूलर ठेवल्याने घरात आर्थिक स्थिरता राहते आणि पैशांशी संबंधित अडचणी कमी होऊ शकतात.

Air cooler Vastu
Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

पूर्व दिशा हा देखील चांगला पर्याय

घराची रचना अशी असेल की उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला कूलर ठेवणं शक्य नसेल तर पूर्व दिशेचा पर्याय निवडू शकता. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला कूलर ठेवल्याने घरातील सदस्यांचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि सकारात्मक विचार वाढतात.

दक्षिण-पूर्व दिशेला कूलर ठेवणे टाळा

वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण-पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय कोपरा हा अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला कूलर ठेवणं योग्य मानलं जात नाही. पाणी आणि अग्नी या दोन तत्त्वांमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास घरात तणाव आणि वाद वाढू शकतात. त्याचप्रमाणे घरात आर्थिक अडचणीही येऊ शकतात.

Air cooler Vastu
Vastu Tips: फ्रिजच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; घरात सुख-समृद्धी टिकवण्यासाठी वास्तूचे हे नियम नक्की पाळा

कूलरची स्वच्छता ठेवणंही महत्त्वाचं

वास्तुशास्त्रानुसार, घरातील खराब झालेला किंवा वापरात नसलेला कूलर बराच काळ अस्वच्छ अवस्थेत ठेवणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे कूलर वापरात नसेल, तर तो स्वच्छ करून ठेवावा. कूलरमधील पाणीही वेळोवेळी बदलणे गरजेचं आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.