Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

फिट राहण्यासाठी फक्त जिम आणि डाएट पुरेसं नाही. दररोज 7-8 तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. झोपेअभावी वजन वाढणं आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.
Belly Fat
Belly FatSaam Tv
Published On

आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणं अनेकांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. जिम, डाएट आणि फिटनेसची चर्चा जोरात असली तरी एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते ती म्हणजे पुरेशी झोप.

आजकाल आपण फीट राहण्यासाठी जिमला जातो, हेल्दी डाएट घेतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, फक्त जीम पुरेसं नाही. एशियन हॉस्पिटलच्या हेड डायटिशियन कोमल मलिक यांच्या मते, दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. झोपेमुळे शरीर स्वतःची दुरुस्ती करतं आणि मेंदूला पूर्ण विश्रांती मिळते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या फिटनेसवर होतो.

झोपेअभावी वाढतात आरोग्याच्या समस्या

जर झोप पूर्ण झाली नाही तर शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात. हार्मोन्समध्ये असंतुलन, वजन वाढणं, सतत थकवा येणं आणि मानसिक ताण वाढणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. तज्ज्ञ सांगतात की, झोप कमी झाल्यास मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि भूक वाढवणारे हार्मोन्स एक्टिवह होतात. त्यामुळे जास्त खाण्याची सवय लागते आणि वजन वाढू शकतं.

Belly Fat
Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

आजच्या काळात मोठ्या शहरांमध्ये, फिट राहणं सोपं नाही. प्रदूषण आणि भेसळयुक्त अन्न याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. आहारात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा योग्य समावेश असायला हवा. काही लोक वजन कमी करण्यासाठी खूप कमी खातात पण ही चुकीची सवय आहे.

कमी खाण्याचे दुष्परिणाम

खूप कमी खाल्ल्यामुळे शरीर अशक्त होतं आणि मेटाबॉलिझमही परिणाम होतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी योग्य प्रमाणात आणि पौष्टिक अन्न घेणं महत्त्वाचं आहे. रोजच्या आहारात भाज्या, फळं, धान्य यांचा समावेश करावा आणि दिवसाला 8 ते 9 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे.

दररोज व्यायामही तितकाच महत्त्वाचा

फिट राहण्यासाठी दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे. यामध्ये योग, जॉगिंग किंवा जिममधील वर्कआउटचा समावेश तुम्ही करू शकता. नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहतं, स्नायू मजबूत होतात आणि मानसिक आरोग्यही सुधारतं. मात्र फक्त व्यायाम करून चालणार नाही त्यासोबत पुरेशी झोपही घ्यावी लागते.

Belly Fat
Oral health problems: सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडतंय? वेळीच व्हा सावध, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण

आजकाल अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे त्यांची संपूर्ण दिनचर्या बिघडते आणि त्याचा परिणाम डाएट आणि व्यायामावर होतो. तज्ज्ञांच्या मते, हेल्दी राहण्यासाठी ठरलेली दिनचर्या पाळणं खूप महत्त्वाचं आहे.

Belly Fat
Puffy Eyes Morning: सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसतेय? किडनीच्या समस्येची ही गंभीर सुरुवात असू शकते

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com