Body shaming : वाढत्या शरीरयष्टीवर चेष्टा नको! तरुण पिढीला मानसिक आधाराची गरज, कशी घ्याल काळजी?

What is body shaming : लठ्ठ असो वा कृश एखाद्याच्या शरीराची खिल्ली उडविल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
Body shaming
Body shamingSaam Tv
Published On

The Impact of Body Shaming and How to Overcome It :

वाढत्या वजनामुळे सध्या तरुण पिढी त्रस्त आहे. या वजनामुळे अनेकदा आरोग्याच्या अनेक समस्यांसह मानसिक ताणही सहन करावा लागतो.

लठ्ठ असो वा कृश एखाद्याच्या शरीराची खिल्ली उडविल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्या व्यक्तीमध्ये स्वत:च्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्या व्यक्तीला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत मत मांडले आहे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा आणि नमाह हॉस्पिटल्सच्या बेरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणतात की, शरीरयष्टीवर चेष्टा करण्यापेक्षा मानसिक आधार देणे केव्हाही चांगले. त्यासाठी काय करायला हवे हे जाणून घ्या.

1.गैरसमजूती दूर करणे

समाजात लठ्ठपणाबद्दल नकारात्मक दृष्टिकोन पहायला मिळतो. लठ्ठपणा हा आळशीपणा, आत्मविश्वास तसेच इच्छाशक्ती कमजोर असल्यामुळे उद्भवतो असा समज आहे. मात्र वजन वाढण्यास अनुवांशिकता, मानसिक आरोग्य (Mental Health) आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती देखील तितक्याच कारणीभूत असल्या तरी याकडे दुर्लक्ष केले जाते. लठ्ठपणा ही मधुमेह (Diabetes), हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब सारखीच एक व्याधी असून वजन कमी केल्यास इतर शारीरिक व्याधी दूर करण्यास मदत होते.

Body shaming
Winter Skin Care : चेहरा सतत तेलकट-चिकट होतोय? हिवाळ्यात अशी घ्याल त्वचेची काळजी

2. वजनामुळे होणारी चेष्टा

लठ्ठ व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या व्यक्तींकडे इच्छाशक्ती आणि शिस्तीचा अभाव असल्याचा गैरसमज दिसून येतो. रोजगार आणि आरोग्य सेवेसह जीवनाच्या विविध क्षेत्रात भेदभाव होतो. लठ्ठ नसलेल्या व्यक्तींविरुद्धही (कृश) व्यक्तींनाही याचा सामना करावा लागतो. समाजात सडपातळ व्यक्तीला अनेकदा सौंदर्यवान, यशस्वी आणि स्वयंशिस्त असल्याचे मानले जाते. ही मानसिकता नैसर्गिकरित्या सडपातळ व्यक्तींवर किंवा कमी वजनाच्या समस्यांशी झुंजणाऱ्यांवर अवास्तव अपेक्षा आणि दबाव लादू शकते.

Body shaming
Garlic Chutney Recipe : झणझणीत अन् टेस्टी राजस्थानी लसणाची चटणी, पाहा रेसिपी

लठ्ठपणाने ग्रासलेल्या व्यक्तींना केवळ कामचुकार म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. तसेच या व्यक्ती आळशी आणि बेजबाबदार, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वाचा अभाव असलेल्या असतात असा चूकीचा समज पहायला मिळतो. लठ्ठ व्यक्तींना सहसा अनाकर्षक ठरविले जाते.

वाढलेल्या वजनामुळे त्या व्यक्तीच्या जीवनाच्या विविध पैलूंवर परिणाम होतात. यामध्ये आत्म-सन्मान कमी होणे, आणि शरीराच्या प्रतिमेबाबत असलेली नकारात्मकता. नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण वाढल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

Body shaming
Chronic Kidney Disease : सावधान! शरीरात ही लक्षणे दिसल्यास होऊ शकतो किडनीवर परिणाम, कशी घ्याल काळजी

व्यावसायिक क्षेत्रात, ज्यांना भेदभावाचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी कमी वेतन आणि पदोन्नती न होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. याव्यतिरिक्त, हानिकारक अशा वजन नियंत्रण पद्धती, सामाजिक अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात जोखीम पत्करावी लागते.

3. बदलाची हाक

लठ्ठ नसलेल्या व्यक्तींमधील पक्षपाताच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शरीरयष्टीनुसार व्यक्तीची पारख न करता शारीरीक कुवतीकडे लक्ष द्यावे. शरीरयष्टीमधील वैविध्य ओळखणे आणि वजनाची पर्वा न करता सर्वांगीण कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यास अनुमती देते.शरीराच्या आकारावरुन खिल्ली न उडवता एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com