Daily Life Hacks : तुम्हाला आयुष्यात ब्रेकची गरज कशी ओळखाल? 'ही' लक्षणं दिसली तर अजिबात दुर्लक्ष करु नका! नाहीतर

Health Tips : आपल्यापैंकी अनेकजण दररोज ऑफिसला जात असेल. काहींचा ऑफिसचा प्रवास अत्यंत लांबचा असतो तर काहींचा जवळ असतो. मात्र अशातच सातत्याने प्रवास करुन व्यक्तीला सुट्टीची आवश्यकता असते.
Health Tips
Daily Life HacksSaam Tv
Published On

मोहिनी सोनार, साम टीव्ही, मुंबई

हल्ली रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही. दिवसभर काम तणाव यात आपल्याला काहीही भान नसतं. अशा वेळी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्ही हे नाही केलंत, तर गंभीर परिणामही होऊ शकतात. त्यातल्या त्यात मेट्रो सिटीजमध्ये राहणाऱ्या लोकांचे तर प्रचंड हाल होतात. त्यांना दोन वेळचं धड जेवायलाही मिळत नाही.

Health Tips
Health Tips: सकाळी या पदार्थांचं सेवन करा अन् ॲसिडिटीला करा गुडबाय

सकाळी लवकर उठून ट्रेन बसचा प्रवास, ऑफिसला (office)गेल्यावर तिथला ताण त्यानंतर प्रेशर, घरातल्या अडचणी या सगळ्या चिंतांमुळे आपण ग्रस्त असतो. अशा वेळी तुम्ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. थोडंसं रिलॅक्स होऊन माईंड रिफ्रेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रेक घेतलाच पाहिजे. मग त्या ब्रेकदरम्यान तुम्ही तुम्हाला जे हवंय ते करा! फिरायला जा, गाणी ऐका, छंद जोपासा, चित्र काढा, घरात आराम करा. अशा सगळ्या गोष्टी करुन स्वतःचं मनोरंजन करा. पण तुम्हाला ब्रेक हवा आहे, हे कधी आणि कसं ओळखायचं? त्याची काही कारणं जाणून घेऊया

1. जेव्हा तुम्हाला मानसिक थकवा (fatigue)जाणवेल, अशावेळी तुमचं तित्त थाऱ्यावर नसेल. कामात चुका होतील. डोकं दुखीही होऊ शकते. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही स्ट्रेस घ्याल. तेव्हा तुम्हाला ब्रेकची नितांत गरज आहे. हे ओळखा.

2. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मानसिक थकवा जाणवत असल्यास आपण प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात ताळमेळ साधू शकत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र करायला लागतो. आणि कुठेच समन्वय साधता येत नाही. त्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींमुळे आपल्या स्वभावातही बदल होतात. तेव्हा थोडा ब्रेक घ्या. आराम करा. आणि पुन्हा सुरुवात करा.

3. मानसिक थकवा आल्यास तुमची चिडचिड वाढते. प्रत्येक गोष्टी तुम्ही चुका शोधायला लागता. आणि घरी किंवा ऑफिसमध्ये चिडचिड होते. अशा परिस्थितीत तुम्हाला ब्रेकची गरज असते.

4. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्ही एकाग्र होऊ शकत नसाल, सारखं लक्ष विचलीत होत असेल. तर मानसिक आरोग्य योग्य नसल्याचं हे चिन्ह आहे.

5. यात सगळ्यात मोठा संकेत म्हणजे झोप(sleep) न येणे. तुम्हाला खूप काम करुनही आणि थकल्यावरही झोप येत नसेल तर तुमचं मानसिक आरोग्य नीट नाही हे समजावं.

6. यासोबतच रोजच्या कामाव्यतिरीक्त तुम्हाला थकवा जाणवतो. कोणतंही काम करण्यासाठी एनर्जी राहत नाही.

ही सगळी लक्षणं जर दिसत असतील, तर तुमचं मानसिक आरोग्य ठीक नाही, आणि तुम्हाला ब्रेकची गरज आहे हे समजावं. त्यामुळे ही सगळी लक्षणं (Symptoms)दिसल्यास त्वरीत ब्रेक घ्या. काही तीव्र त्रास जाणवल्यास मानसोपचार तज्ज्ञांशी बोला. याचा विचार न केल्यास तुमच्या नर्वस सिस्टिमवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एवढंच नाही तुमच्या मेंदूवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे विसरभोळेपणा होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा, ब्रेक घ्या आणि आनंदी राहा.

Health Tips
Monsoon Health Tips : मुसळधार पावसात फक्कड चहा हवाच! पण 'या' चुका केल्यास आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com