Hair Care Tips : केसांना मजबूत आणि लांबसडक बनवण्यासाठी 'हे' तेल ठरेल गुणकारी, जाणून घ्या

Rosemary Oil Benefits : प्रत्येक स्त्रीच स्वप्न असते की तिचे केस सुंदर, जाड आणि लांब असावेत.
Hair Care Tips
Hair Care TipsSaam Tv
Published On

Rosemary Oil For Hairs :

अनेक महिला केस वाढवण्यासाठी खूप कष्ट करतात. प्रत्येक स्त्रीच स्वप्न असते की तिचे केस सुंदर, जाड आणि लांब असावेत. रॅपन्झेलची कहाणी तुम्हाला माहिती असेलच. डिस्ने अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर Rapunzel सारखे लांबलचक आणि मजबूत केस पाहिजे. तिचा मित्र तिच्या केसांमार्फत चढून खिडकीतून खोलीत शिरायचे.

तुम्हालाही असे मजबूत केस हवे असतील तर रोझमेरी तेल (Oil) वापरा, त्यामुळे तुमचे केस सुंदर आणि लांब होतील. चला तर मग जाणून घेऊया हे तेल केसांना लावण्याचे फायदे (Benefits) आणि मग ते कसे वापरायचे ते कळेल.

रोझमेरी तेल केसांसाठी फायदेशीर आहे

रोझमेरी तेल अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ज्यामुळे टाळूची जळजळ कमी होते. हे तुमच्या टाळूचे छिद्र स्वच्छ करतात. ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केसांची (Hair) वाढ झपाट्याने होते.

केस गळणे थांबवते

रोझमेरी तेल हे रक्ताभिसरण सुधारते. हे केसांमधील रक्त कमी करते आणि केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर नारळाच्या तेलात रोझमेरी तेल मिसळून लावा. हे तुमचे केस गळण्यापासून रोखते.

Hair Care Tips
Yoga To Reduce Hair Fall : केस गळतीमुळे रडकुंडीला आला आहात? नियमित करा ही योगासने, गळणं होईल कमी

सफेद केसांसाठी

सफेद केसांसाठी रोझमेरी तेल वापरणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. हे केसांमध्ये कोलेजन वाढवते आणि केसांचा रंग वाढवण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे केसांचे मूलतः नुकसान कमी करते जेणेकरून तुमचे केस सफेद होणार नाहीत.

Hair Care Tips
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

केसातील कोंड्यावर फायदेशीर

रोजमेरी तेल हे केसात होणाऱ्या कोंड्यावर फायदेशीर आहे. हे अँटी डँड्रफ आहे जे स्कॅल्प साफ करण्यास उपयुक्त आहे. हे कोंडा टाळण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हे कोरड्या किंवा खाजत असलेल्या टाळूला देखील मदत करू शकते आणि ही खाज कमी करू शकते. त्यामुळे नारळाच्या तेलात रोझमेरी तेल मिसळा आणि केसांना लावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com