Yoga To Reduce Hair Fall : केस गळतीमुळे रडकुंडीला आला आहात? नियमित करा ही योगासने, गळणं होईल कमी

Hair Falls Reasons : खराब जीवनशैली, चुकीचा आहार आणि आहारातील पोषणतत्व ज्यामुळे केस अधिक प्रमाणात गळतात
Yoga To Reduce Hair Fall
Yoga To Reduce Hair FallSaam Tv

Hair Falls Yoga :

केस गळतीची समस्या हल्ली वयोमानानुसार दिसून येत आहे. कमी वयात अनेकांचे केस अधिक कमकुवत आणि पातळ झाले आहेत. ज्यामुळे केस अकाली पिकण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

केस गळतीचे प्रमुख कारण आहे. खराब जीवनशैली, चुकीचा आहार आणि आहारातील पोषणतत्व ज्यामुळे केस अधिक प्रमाणात गळतात. केस गळती रोखण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पदनांचा वापर करतो. परंतु केस गळती काही केल्या थांबत नाही. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांचा अवलंब करून केसांना काळे आणि घट्ट करता येते. यासाठी आपल्याला जीवनशैली आणि आहार सुधारा. काही योगासनांची सवय लावा. केसगळतीचा त्रास असलेले लोक काही विशेष योगासने करू शकतात. जाणून घेऊया कोणती योगासने करायला हवे.

Yoga To Reduce Hair Fall
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

1. शीर्षासन :

शीर्षासन केल्याने डोक्याकडे होणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ चांगली होते. ज्यांचे केस गळती (Hair Falls) थांबते. तणाव कमी करण्यासाठी शीर्षासन फायदेशीर आहे.

2. बालासन:

बालासनाच्या सरावाने पोटाशी संबंधित समस्या आणि तणावापासून आराम मिळू शकतो. पोटाच्या समस्या आणि तणावामुळे (Stress) केस गळतात. त्यामुळे केसांची वाढ खुटंते. यासाठी बालासन नियमित करायला हवे.

3. त्रिकोनासन :

केस अकाली पांढरे होत असतील, केसांमध्ये कोरडेपणा येत असेल आणि केस जास्त गळल्यामुळे पातळ दिसत असतील तर त्रिकोणासन करा. ज्यामुळे अकाली पिकणाऱ्या केसांपासून सुटका मिळेल.

Yoga To Reduce Hair Fall
Happy Life Tips: दु:खातही आनंदी राहाण्याची गुरुकिल्ली! या सोप्या टिप्स फॉलो करा

4. उत्तानासन :

उत्तानासनाचा नियमित सराव केल्यास केसांच्या समस्या कमी होतात. अकाली पिकणारे केस, केस गळती, केसांत होणारा कोंडा यापासून सुटका होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com