Summer Kitchen Ideas : 12 दिवस खराब होणार नाही पुदिना, कोथिंबीर आणि कडीपत्ता; स्टोअर करताना 'या' टिप्स फॉलो करा

Mint Coriander and Curry Leaves Store : कडीपत्ता, कोथींबीर आणि पुदिना फ्रिजमध्ये स्टोअर केले तरी काही ३ ते ४ दिवसांनी काळे पडतात किंवा सुकून जातात. त्यामळे जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठीच्या काही सिंपल टिप्स जाणून घेऊ.
Mint Coriander and Curry Leaves Store
Summer Kitchen IdeasSaam TV

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्यात विविध भाजीपाला घरी आणल्यावर आपण लगेचच तो फ्रिजमध्ये ठेवतो. आता प्रत्येक भाजीत किंवा डाळीमध्ये कडीपत्ता, कोथिंबीर तसेच पुदिना आवश्यक असतो. मात्र कडीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना फ्रिजमध्ये स्टोअर केले तरी काही ३ ते ४ दिवसांनी काळे पडतात किंवा सुकून जातात. त्यामळे कडीपत्ता, कोथींबीर आणि पुदिना जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठीच्या काही सिंपल टिप्स जाणून घेऊ.

Mint Coriander and Curry Leaves Store
Coriander Chutney : उन्हाळ्यात बनवा राजस्थानी स्टाईल कोंथिबीरीची चटणी, शरीराला होतील अनेक फायदे !

पुदिन्यासाठी टिप्स

पुदिना घरी आणल्यावर स्वच्छ निवडून घ्या. यात जर थोडी खराब पाने असतील तर ती सर्व काढून टाका. त्यानंतर पुदिना पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. पुदिना धुवून झाल्यावर त्यातील सर्व पानी गाळून घ्या. तसेच एका सुती कापडाने पुदिना स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर एका हवाबंद प्लास्टीक बॅगमध्ये पुदिना भरून ठेवा. हा पुदिना फ्रिजमध्ये भाज्या जिथे स्टोअर करता तिथेच ठेवा.

कोथिंबीरसाठी टिप्स

कोथिंबीर तुम्ही फ्रिजमध्ये न ठेवता सुद्धा अगदी १४ दिवस फ्रेश ठेवू शकता. यासाठी कोथिंबीर आणल्यावर त्याला असलेली सर्व माती साफ करून घ्या. त्यानंतर कोथिंबीरीची जुडी पुन्हा बांधून घ्या. तसेच एका ग्लासात पाणी भरून घ्या. पाण्यामध्ये कोथिंबीरचे देठ बुडवून ठेवा. तसेच कोथिंबीर वरून पातळ प्लास्टिकच्या पिशवीने झाकून ठेवा. अशा पद्धतीने कोथिंबीर स्टोअर केल्यास ती अगदी १५ दिवस सुद्धा ताजी आणि टवटवीत राहील.

कडीपत्त्यासाठी टिप्स

पडीपत्ता घरी आनल्यावर देठापासून वेगळा करून घ्या. त्यानंतर कडीपत्त्याची सर्व पाने एका पेपर टॉवेलवर ठेवा. तसेच छान पुसून घ्या. कडीपत्ता जास्त दिवस टिकावा यासाठी त्यामध्ये थोडंही पाणी किंवा आद्रता राहणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी आधी एक हवाबंद डब्बा घ्या. तो स्वच्छ पुसून घेतल्यावर त्यात कडिपत्त्याची पाने भरून ठेवा. याला थोडीही उष्णता लागणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी कडीपत्त्याचा डब्बा फ्रिजमध्येच ठेवा.

Mint Coriander and Curry Leaves Store
Benefits of Coriander : रोजच्या जेवणात खा कोथिंबीर, हे ६ आजार पळून जातील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com