Coriander Chutney : उन्हाळ्यात बनवा राजस्थानी स्टाईल कोंथिबीरीची चटणी, शरीराला होतील अनेक फायदे !

Food : साधे जेवण सुद्धा चटणीचीमुळे खूप चवदार लागते त्यामुळे लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासोबत लोणचे आणि चटणी खायला आवडते
Coriander Chutney
Coriander ChutneySaam Tv
Published On

Coriander Chutney : हिरवा कोथिंबीर आणि पुदिना घालून केलेली अप्रतिम चटणी जेवणाची चव दुप्पट करते.ही चटणी चपाती-भाजी,डाळ-भात सोबत एकत्र केल्याने जेवणाची चवच बदलते. आज आम्ही तुम्हाला ही मसालेदार चटणी बनवण्याची पद्धत तेही राजस्थानी स्टाईलमध्ये कशी बनव्याची ते सांगणार आहोत.

या झणझणीत चटणीची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा खाल्ल्यावर परत खाण्याची इच्छा होईल. साधे जेवण सुद्धा चटणीचीमुळे खूप चवदार लागते त्यामुळे लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासोबत लोणचे आणि चटणी खायला आवडते. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर यावेळी तुम्ही राजस्थानी स्टाईल हिरवी कोथिंबीर चटणी करून पहा, ही चटणी केवळ 10 मिनिटांत तयार होते.

Coriander Chutney
Pudina Chutney Recipe : पोटाची जळजळ थांबवण्यासाठी पुदिन्याची चटणी ठरेल फायदेशीर, पाहा रेसीपी

1. साहित्य

  • कोथिंबीर चिरलेली - 1 कप

  • पुदिन्याची चिरलेले पाने - 2 कप

  • जाड हिरवी मिरची चिरलेली - 1 टेबलस्पून

  • हिरवा कांदा (Onion) चिरलेला - 1/2 कप

  • लिंबाचा रस - 1 टेबलस्पून

  • आले चिरून - 1 टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

Coriander Chutney
Tomato chutney Recipe : अगदी 10 मिनिटांत बनवा टोमॅटोची आंबट-गोड चटणी !

2. कृती

  • हिरव्या कोथिंबीरची चटणी बनवण्यासाठी पुदिना आणि हिरवी कोथिंबीर पाण्यात टाकून स्वच्छ (Clean) धुवून घ्या.

  • नंतर कोथिंबीर काही वेळासाठी बाजूला ठेवा आणि त्यातील जास्तीचे पाणी (Water) काढून टाका.

  • पुदिन्याची चिरलेले पाने आणि चिरलेली कोथिंबीर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या त्यासोबतच बारीक चिरलेले आले आणि हिरवे कांदे, एक चतुर्थांश कप पाणी, चवीनुसार मीठ टाकून पेस्ट तयार करा.

  • जर तुम्हाला हवे असल्यास एक चमचा लिंबाचा रस घाला किंवा चटणी केल्यानंतर ही तुम्ही घालू शकता.

  • लक्षात ठेवा की चटणी बारीक वाटायची आहे. नंतर तयार चटणी एका बरणीत काढून ठेवा. तुम्ही ही चटणी लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com