cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडतं? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

store oil bottle : कुकिंग ऑइलची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि आरोग्याला होणारे नुकसान टाळण्यासाठी ते योग्य प्रकारे स्टोअर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
cooking oil storage
cooking oil storagemeta ai
Published On: 

store oil bottle : तुम्ही कितीही चांगल्या दर्जाचे कुकिंग ऑइल (खाद्यतेल) वापरत असाल, पण जर ते योग्य रीतीने स्टोअर करुन ठेवले नाही, तर त्याचे फायदे कमी होऊ शकतात. अशा वेळी कुकिंग ऑइल स्टोअर करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणुन घेऊया.

उष्ण जागेवर ठेवणे टाळा

तेलाची बाटली गॅस किंवा शेगडीच्या शेजारी अथवा उष्णतेच्या संपर्कात ठेवणे टाळावे. गॅस किंवा स्टोव्हच्या उष्णतेमुळे तेलात ऑक्सिडेशनचा वेग वाढतो, ज्यामुळे तेल लवकर खराब होऊ शकते. खराब झालेल्या तेलात फ्री रॅडिकल्स वेगाने तयार होतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. तेल ठेवण्यासाठी नेहमी अंधारी आणि थंड जागा निवडावी.

cooking oil storage
High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

सूर्य प्रकाशात ठेवणे टाळा

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची बाटली थेट सूर्याच्या प्रकाशात ठेवणे टाळा. ऊन किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे तेलाची गुणवत्ता खूप लवकर खराब होते आणि त्याला वास येऊ शकतो.

ओल्या चमचाचा वापर टाळा

तेल किंवा तुपात ओला चमचा घालणे टाळा. तेलामध्ये ओलावा/दमटपणा आल्यामुळे ते लवकर खराब होते. तेलात पाण्याचा एक थेंब जरी गेला, तरी त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया निर्माण होण्याचा धोका वेगाने वाढतो.

cooking oil storage
Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

तेल जास्त वेळ उघडे ठेऊ नका

कुकिंग ऑइल जास्त वेळ उघडे ठेवणे टाळा. उष्णता, प्रकाश, ऑक्सिजन आणि ओलावा हे तेलाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. तेल जास्त वेळ उघडे ठेवल्यास त्यातील व्हिटॅमिन्स कमी होतात आणि ओलाव्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com