Sakshi Sunil Jadhav
कोमट पाण्यात थोडं मीठ मिसळून गुळण्या केल्याने तोंड आणि घशातला काही बॅक्टेरिया कमी होतो.
दालचिनीतले सिनेमिक अॅल्डिहाइडसारख्या घटकांमुळे तोंडातली दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियावर परिणाम होण्यास मदत मिळू शकते.
ग्रीन टीमधील पॉलीफेनॉल्स तोंडातली दुर्गंधी निर्माण करणाऱ्या काही संयुगांवर परिणाम करू शकतात, त्यामुळे दिवसातून १ ते २ कप घेणं फायदेशीर ठरू शकतं.
पुदिन्याची पानं चघळल्याने तोंडाला ताजेपणा मिळतो आणि काही काळासाठी दुर्गंधी कमी जाणवू शकते.
जेवणानंतर १ वेलची चघळल्याने तिच्या नैसर्गिक सुगंधामुळे तोंडातली दुर्गंधी काही प्रमाणात झाकली जाऊ शकते.
बडीशेप चघळल्याने लाळेचं प्रमाण वाढायला मदत होते, त्यामुळे तोंड कोरडेपणामुळे होणारी दुर्गंधी कमी होऊ शकते.
लिंबाच्या आम्लामुळे ताजेपणा जाणवू शकतो, मात्र वारंवार किंवा थेट लिंबाचा वापर केल्याने दातांच्या एनॅमलवर परिणाम होऊ शकतो.
लवंगेमधील काही घटक तोंडातील जंतूंवर परिणाम करू शकतात, मात्र ती चघळताना किंवा चोखताना प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे.