Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

Sakshi Sunil Jadhav

नात्यातला राग

रागाच्या भरात “तुझ्यासोबत नातं जोडणं ही माझी चूक होती” असं बोलणं जोडीदाराच्या मनाला खोलवर दुखावू शकते.

relationship advice

नकारात्मक उल्लेख

“मी तुझ्याशी लग्नच करायला नको होतं” अशा वाक्यांमुळे नात्यातील विश्वासाला मोठा धक्का बसू शकतो.

relationship tips

आर्थिक परिस्थितीवरून टोमणे

जोडीदाराची कमाई, कुटुंबाची आर्थिक पार्श्वभूमी किंवा जुनी परिस्थिती भांडणात वापरणं अपमानास्पद ठरू शकते.

things to avoid in relationship

जोडीदाराच्या कुटुंबाचा अपमान

सासरचे किंवा माहेरचे लोक आवडत नसले तरी त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलल्याने नात्यात तणाव वाढू शकतो.

relationship problems

मित्रमैत्रिणींवरून कमी लेखू नका

जोडीदाराच्या जवळच्या मित्रांचा किंवा मैत्रिणींचा सतत अपमान केल्याने त्याला किंवा तिला तुमच्याबद्दल नाराजी निर्माण होऊ शकते.

marriage advice

कमकुवतपणाची चेष्टा करू नका

भीती, न्यूनगंड, दिसण्याबद्दलची चिंता वैयक्तिक कमतरता विनोदाचा विषय बनवणं मनाला मोठी दुखापत देऊ शकते.

relationship trust

जुन्या चुका बोलू नका

भूतकाळातील चुका प्रत्येक भांडणात समोर आणल्याने समस्या सुटण्याऐवजी कटुता आणखी वाढते.

relationship trust

तुलना करून दुखावू नका

इतर व्यक्ती, मित्र, नातेवाईक किंवा पूर्वीच्या जोडीदाराशी तुलना केल्याने पार्टनरचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

relationship trust

NEXT : नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळं काहीतरी! गणरायासाठी बनवा स्वादिष्ट शेवयांची उकडवाटी

Shevayanchi Ukadwadi recipe | meta ai
येथे क्लिक करा