Ganpati Naivedya Recipe : नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळं काहीतरी! गणरायासाठी बनवा स्वादिष्ट शेवयांची उकडवाटी

Sakshi Sunil Jadhav

उकडवाटीची रेसिपी

घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होऊन, बाप्पााच्या नैवेद्याची तयारी सुरू असेल. अशा वेळेस तुम्ही झटपट शेवयांची उकडवाटी तयार करू शकता.

Shevayanchi Ukadwadi recipe

काजू-बदामाची तयारी करा

कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि अक्रोडाचे बारीक तुकडे परतून घ्या.

Shevaya Ukadwadi

शेवया भाजून घ्या

आता त्याच कढईत बारीक शेवया घालून त्या छान परतून घ्या. शेवयांना हलका सुवास येईपर्यंत भाजणे महत्त्वाचे आहे.

Ganpati Naivedya Recipe

मिश्रणात मीठ आणि दूध घाला

शेवया परतल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यानंतर मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यात दूध आणि थोडं जायफळ किसून घाला.

Ganesh Chaturthi Recipe

तांदळाची पीठी वापरा

मिश्रण तयार झाल्यावर भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ आणि तूप घालून उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यात तितकेच तांदळाचं पीठ घालून एकत्र करा.

Bappa Naivedya

उकडी तयार करा

गॅस बंद करून हे मिश्रण उकड गरम असतानाच उकडपत्रीमध्ये छान मळून घ्या. यामुळे उकड मऊ आणि व्यवस्थित तयार होईल.

Ganpati special food

शेवयांचे मिश्रण भरून आकार द्या

तयार उकडीची छान चाळणी करून त्यावर साजूक तूप लावा. उकडीचे छोटे गोळे करून त्यावर तयार केलेले शेवयांचे मिश्रण भरा आणि त्याला आपल्या आवडीनुसार आकार द्या.

Shevaya recipe

वाफवून नैवेद्य दाखवा

तयार केलेले पदार्थ वाफेवर शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर साजूक तुपाची धार सोडून बाप्पाला नैवेद्य दाखवा.

Shevaya recipe

NEXT : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

packaged foods sodium
येथे क्लिक करा