Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Sakshi Sunil Jadhav

मीठाचे महत्त्व

सोडियममुळे शरीरातल्या द्रवपदार्थांचे संतुलन, स्नायू आणि मज्जासंस्थेचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

recommended salt intake

प्रौढांनी किती मीठ खावे?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढांनी दिवसाला एकूण ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ, म्हणजे साधारण एक चमचा, घेण्याचा प्रयत्न करावा.

salt for men

पुरुषांसाठी किती मीठ योग्य?

पुरुषांसाठी वेगळं जास्त प्रमाण आवश्यक नसून, प्रौढांसाठी सुचवलेली दिवसाची मर्यादा साधारण ५ ग्रॅमपेक्षा कमीच आहे.

salt for women

महिलांसाठी किती मीठ योग्य?

महिलांनीही दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ घेणं योग्य मानलं जातं. मात्र व्यक्तीच्या आरोग्यानुसार गरज बदलू शकते.

how much salt per day

जास्त मीठाचा परिणाम

तुम्ही आहारात सोडियमचं प्रमाण जास्त घेतलंत तर रक्तदाब वाढण्याचा धोका वाढू शकतो आणि ह्रदय, किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

healthy salt intake

मीठ घातलेले पदार्थ

पॅकेज्ड स्नॅक्स, लोणची, पापड, सॉस, चिप्स, इन्स्टंट नूडल्स आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून नकळत जास्त सोडियम मिळू शकते.

healthy diet

मीठाचे प्रमाण कमी करा

जेवणात वरून मीठ घालण्याची सवय कमी करा आणि पॅकेज्ड पदार्थ खरेदी करताना लेबलवरील सोडियमचे प्रमाण तपासा.

salt and kidney health

योग्य सवय

चव वाढवण्यासाठी मीठाऐवजी लिंबू, कोथिंबीर, मसाले आणि इतर नैसर्गिक फ्लेवर्सचा वापर करून हळूहळू मीठाचे प्रमाण कमी करता येते.

packaged foods sodium

महत्त्वाची टिप

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही. उच्च रक्तदाब, किडनी किंवा हृदयाशी संबंधित आजार असल्यास आहारातील मीठाचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा.

packaged foods sodium

NEXT : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

steamed sweet patole
येथे क्लिक करा