High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Surabhi Jayashree Jagdish

आहाराचा रक्तदाबावर परिणाम

उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. आनुवंशिकता आणि ताण यांच्यासोबत आपल्या रोजच्या आहाराचाही रक्तदाबावर परिणाम होतो. त्यामुळे काही पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा ते योग्य प्रमाणात खाणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.

Foods that raise blood pressure | saam tv

साखरयुक्त पेयं

सॉफ्ट ड्रिंक्स आणि साखर घातलेले ज्यूस यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. यांचं जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्याचा रक्तदाबावरही परिणाम होतो.

Blood pressure diet | saam tv

कॉफी

कॉफीमधील कॅफिनमुळे काही लोकांमध्ये काही काळासाठी रक्तदाब वाढू शकतो. कॅफिनचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा होत नाही आणि कॅफिनला संवेदनशील असलेल्या लोकांमध्ये तो जास्त जाणवू शकतो.

Foods to avoid for high BP | saam tv

इन्स्टंट नूडल्स

इन्स्टंट नूडल्स पटकन तयार होतात, पण त्यामध्ये सोडियम म्हणजेच मीठाचं प्रमाण जास्त असू शकतं. एका पॅकेटमधून दिवसासाठी शिफारस केलेल्या मीठापेक्षा जास्त प्रमाणात सोडियम मिळू शकतं. त्यामुळे नूडल्स बनवताना मसाल्याचं अर्धे पॅकेट वापरा किंवा त्याऐवजी हर्ब्स आणि कमी मीठ वापरा.

Sodium and blood pressure | saam tv

प्रक्रिया केलेलं मांस

सॉसेज, हॅम आणि इतर प्रक्रिया केलेले मांस टिकवण्यासाठी अनेकदा मीठ आणि इतर पदार्थ वापरले जातात. त्यामुळे अशा पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असू शकतं. ज्यामुळे रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.

Sodium rich foods | saam tv

चीज

चीजमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असतात, त्यामुळे ते पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र चेडर, परमेसन आणि फेटासारख्या काही चीजमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे यांच्या सेवनानेही ब्ल़ड प्रेशर वाढू शकतं.

Hypertension foods | saam tv

ब्रेड आणि बेकरी पदार्थ

ब्रेड, बन आणि बॅगल्स यांसारख्या पदार्थांमध्ये चव, पोत आणि जास्त काळ टिकण्यासाठी मीठ वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण वेगळे मीठ न घातलं तरी अशा पदार्थांमधून शरीरात सोडियम जाऊ शकतं.

Healthy eating | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart health | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा