High Cholesterol Food : वाढते कोलेस्ट्रॉल झटकन होईल कमी; या फळांचा आहारात समावेश करा, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

Bad Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक, स्ट्रोक व इतर गंभीर आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
High Cholesterol Food
High Cholesterol FoodSaam Tv

How To Control High Cholesterol :

रक्तातील कोलेस्ट्रॉल अचानक वाढल्यास आपल्याला त्रास होतो. ज्यामुळे आपण गंभीर आजाराला बळी पडतो. कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्यासाठी अधिक घातक समजले जाते. यामुळे आपल्याला हार्ट अटॅक, स्ट्रोक व इतर गंभीर आजारांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

कोलेस्ट्रॉलला लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणूनही ओळखले जाते. चांगले कोलेस्ट्रॉल हे अनेक आजारांपासून वाचवते तर वाईट कोलेस्ट्रॉल हे अनेक आजारांना निमंत्रण देते. जर तुमचेही कोलेस्ट्रॉल सतत वाढत असेल तर आहारात या फळांचा नियमित समावेश करा.

High Cholesterol Food
Detox Drink: असे बनवा डिटॉक्स वॉटर, सुटलेलं पोट आठवड्याभरात झरकन कमी होईल

1. सफरचंद

वाढते कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करण्यासाठी सफरचंद बहुगुणी फळ समजले जाते. यामध्ये असणारे फायबर खराब कोलेस्ट्रॉल विरघळवण्यास मदत करतात. ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहाते. याशिवाय सफरचंदात असलेले पॉलीफेनॉल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

2. केळी

केळीमध्ये (Banana) फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरची पातळी कमी करण्यास मदत होईल. केळीमध्ये असणारे फायबर शरीर निरोगी ठेवण्यासाठी अधिक मदत करतात.

High Cholesterol Food
Turtiche Fayde: त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे तुरटी, फायदे वाचाल तर रोज वापराल

3.अननस

अननस हे अनेक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजांचा परिपूर्ण स्त्रोत आहे. यामध्ये असणारे ब्रोमेलेन खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदय निरोगी राहाते.

4. एवोकॅडो

ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी एवोकॅडोचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो. यात असणारा ओलेइक ऍसिडने ते समृद्ध असतात. ज्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

High Cholesterol Food
Highest Waterfall In Satara : डोंगरदऱ्यातून कोसळणारा साताऱ्यातील सगळ्यात उंच धबधबा पाहिलात का?

5. लिंबूवर्गीय फळे

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर अधिक प्रमाणात असते. यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत होते. तसेच यात असणारे व्हिटॅमिन सी हृदयविकार आणि रक्तदाबाचा धोका टाळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com