Waterproof Makeup : पावसाळ्यातही सौंदर्य अबाधीत राहिल; ट्राय करा वॉटरप्रूफ मेकअप

Monsoon Waterproof Makeup : ऋतु कोणताही असू दे प्रत्येक महिलेला नटायला खूप आवडते. पण पावसात पाण्याची एक सर येताच हा मेकअप धुवून निघतो. अशात पावसात वॉटरप्रूफ मेकअप कसा करावा जाणून घेऊयात.
Monsoon Waterproof Makeup
Waterproof MakeupSAAM TV

आजकाल मेकअप हा महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. प्रत्येक महिलेला नेहमी सुंदर दिसायला आवडते. त्यासाठी ती फॅशनसोबतच आपल्या मेकअपवरही तेवढेच लक्ष देते. पण पावसात मेकअप जास्त काळ टिकत नाही अशी तक्रार प्रत्येक महिलेची असते. कारण मेकअपचा पाण्याशी संपर्क आल्यास मेकअप धुतला जातो. पण आता तुम्ही पावसातही मेकअप करून तुमचे सौंदर्य वाढवू शकता. यासाठी फक्त तुम्हाला मेकअपमध्ये काही बदल करावे लागती. चला तर मग पावसात वॉटरप्रूफ मेकअप कसा करावा जाणून घेऊयात.

मेकअप बेस

पावसात मेकअप टिकून राहण्यासाठी त्याचा बेस चांगला असणे महत्त्वाचे आहे. चांगल्या बेसमुळे त्वचेवर बराचकाळ मेकअप टिकून राहतो. मेकअपला सुरुवात करण्याआधी बर्फाने चेहऱ्याला १० ते १५ मिनिटे छान मसाज करा आणि त्यांनतर मऊ कपड्याने चेहरा छान स्वच्छ करून घ्या.

मॅट प्रोडक्टचा वापर

पावसात लिक्विड फाउंडेशन जास्त काळ टिकत नाही. पावसाचे पाणी चेहऱ्यावर पडताच फाउंडेशन त्वचेवरून धुतले जाते. त्यामुळे पावसात मॅट फिनिशिंग देणारी पावडर चेहऱ्याला लावावी. मॅट प्रोडक्ट चेहऱ्यावरील तेल शोषून घेतात. यामुळे तुमचा चेहरा अधिक चमकदार दिसू लागतो. पावसात डोळ्यांच्या सौंदर्यासाठी देखील मॅट प्रोडक्टचा वापर करावा. तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की, डोळ्यांतून थोडे सुद्धा पाणी आले किंवा चेहरा धुतला तर काजळ आणि आयलाइनर पाण्यासोबत चेहऱ्यावर पसरते आणि चेहरा काळा होतो. पावसात असे होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे मॅट आयलाइनर आणि मॅट काजळ यांचा वापर करावा. जेणेकरून तुमचा डोळ्यांचा मेकअप पाण्यात भिजल्यावरही पसरणार नाही आणि तुमचे सौंदर्य कायम राहील.

Monsoon Waterproof Makeup
Skin Problems: चेहऱ्यावर आघात झाल्यावर कसे कराल उपचार? जाणून घ्या डॉक्टरांकडून

मॅट लिपस्टिक

पाऊस असो वा उन्हाळा आपल्याला ओठांचे सौंदर्य टिकवायचे असेल तर नेहमी मॅट लिपस्टिपचा वापर करावा. कारण लिक्विड लिपस्टिक कधीही दिर्घकाळ टिकत नाही. मॅट लिपस्टिप कितीही पाण्याच्या संपर्कात आली तरी पसरत नाही. त्यामुळे पावसात मॅट लिपस्टिकची जास्त मदत होते.

मेकअप स्प्रे

मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी मेकअप स्प्रे करावा लागतो. पण हा स्प्रे चेहऱ्याच्या व डोळ्यांच्या आरोग्यासाठी थोडा घातक असतो म्हणून त्याचा कमीत कमी वापर करावा. पावसात एखाद्या मोठ्या पार्टीला किंवा कार्यक्रमाला जायचे असल्यास मेकअप केल्यानंतर नक्कीच स्प्रे करा. यामुळे पाण्यात भिजलात किंवा तुम्हाला घाम जरी आला तरी मेकअप उतरणार नाही.

Monsoon Waterproof Makeup
Beauty Hacks : एमर्जंसीमध्ये उपयोगी पडणारे ब्युटी हॅक्स; प्रत्येक मुलीला 'या' ट्रिक्स माहितच असाव्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com